मुंबई
आधी काँग्रेस त्यानंतर भाजप, नंतर शिवसेना आणि वर्षभरापूर्वी शिंदे गटात सामील झालेले कृष्णा हेगडे यांनी संजय राऊतांना चुकीचं ठरवलं आहे. याशिवाय अयोध्या राम मंदिरात उद्धव ठाकरेंना आमंत्रण नसल्याचं समर्थन केलं आहे.
माजी आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले, दीड वर्षात संजय राऊतांनी सामनात जे काही लिहिलं ते चुकीचं ठरलं आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्या राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं नसल्यामुळे संजय राऊतांनी आक्षेप व्यक्त केला. मात्र ठाकरेंकडे कोणतंही संविधानिक पद नाही. दुसरं म्हणजे राम मंदिर आंदोलन आणि उभारणीत उद्धव ठाकरेंची कोणतीही भूमिका नाही.
काय म्हणाले कृष्णा हेगडे? पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/therajkaran/videos/805755024687238
दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून दिली आहे. आणि त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केली आहे, अशा शब्दात कृष्णा हेगडेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.