शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला.
पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघालेले आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, धारावीकरांना 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे. धारावीकरांना धारावीत घरं मिळाली पाहिजेत. धारावीचा विकास सरकारनं केला पाहिजे.
उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला मोठी गर्दी झाली होती.
उद्धव ठाकरे सत्तेवर आहेत तोपर्यंत मुंबई गिळता येणार हे लक्षात आल्यानं सरकार पाडलं की काय असं वाटू लागलंय, असं म्हणत उद्धव ठाकरे हल्लाबोल केला.
यावेळी कार्यकर्तेही मोठ्या उत्साहाने मोर्चात सहभागी होत अदानींना धारावी पुनर्विकास प्रकल्प देण्याबाबत विरोध दर्शवला.