महाराष्ट्र ताज्या बातम्या

Skill Hub : महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा

मुंबई : राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडून परिवर्तनशील शिक्षण, संशोधन आणि उद्योग सहकार्यास नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब (MAISH) उभारण्यात येणार आहे. या हबमुळे ऊर्जा, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या हब संदर्भात चर्चा झाली.

मंत्री पाटील म्हणाले की, महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून राज्याला शाश्वत ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचे ध्येय असलेला दूरदर्शी संकल्प आहे. हा हब ऑस्ट्रेलिया-इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्या बैठकीतून या उपक्रमाला आकार मिळाला आहे.

मुंबई, पुणे व नागपूर या शिक्षण व उद्योग केंद्रांना हवामान बदल, ऊर्जा मागणी आणि शाश्वत विकासाच्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक संशोधन व त्याचे व्यावसायिक रूपांतरण आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्याचा नवा अध्याय या हबच्या माध्यमातून सुरू होईल.

या उपक्रमात आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यासह न्यू कॅसल, मोनॅश, आरएमआयटी व सिडनी विद्यापीठ सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना परदेशातील अभ्यासक्रम, विशेष कौशल्य प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावरील संधी मिळणार आहेत.

या हबमधून पीएचडी, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, ऊर्जा व आरोग्य क्षेत्रातील किमान पेटंट तंत्रज्ञानाची निर्मिती तसेच आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचे आदानप्रदान साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात