ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘बाळासाहेबांनी तीन वर्षे मला वचन दिलं होतं’, परंतू…; स्मिता ठाकरेंची मुलाखत चर्चेत

X: @therajkaran

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आणि एकेकाळी राजकीय वर्तुळात चर्चिल्या गेलेल्या स्मिता ठाकरे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. त्यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा केली. गेल्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर स्मिता ठाकरे पुन्हा राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

साहेबांकडून खूप शिकले..
लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा ठाकरे कुटुंबात गेले तेव्हा भीती होती. मात्र माँ साहेब आणि बाळासाहेबांनी खूप प्रेम दिलं. त्यांना पाहून खूप शिकायला मिळालं. माँ साहेब कुटुंबाची ऊर्जा होत्या. त्या गेल्यानंतर सर्वांनाच खूप धक्का बसला होता. त्या गेल्यानंतर कुटुंब विखुरलं गेलं. त्यांनीच सर्वांना जोडून ठेवलं होतं.

पुढे स्मिता ठाकरे म्हणाल्या, माझ्या स्वभावानुसार मी त्यावेळी खूप भेटी-गाठी घेत होते. त्यावेळी बाळासाहेबही मला प्रोत्साहन देत होते. त्यांच्या सांगण्यानुसार मी लोकांना भेटत होते, संवाद साधत होते. लोकांना ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं. मी त्यावेळीही तेच करीत होते. लोकांच्या मदतीला येणं हाच माझं जगण्याचा उद्देश होता. सुरुवातीला उद्धव ठाकरे राजकारणात नव्हते. ते फोटोग्राफीत रमले होते आणि चांगलं करीत होते. राज ठाकरे आधीपासून राजकारणात होते. त्यांनी बाळासाहेबांचं काम, बोलण्याची पद्धत आत्मसात केली होती. एके दिवशी उद्धव ठाकरेंनी राजकारणात येण्याचं ठरवलं आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या.

राजकीय अनुभवाविषयी स्मिता ठाकरे म्हणाल्या, मी कधीच सक्रिय राजकारणात कधीच नव्हते. मात्र मला सामाजिक कामात आवड होती. घटस्फोटानंतर मला माझी ऊर्जा चांगली आणि पॉझिटिव्ह कामात लावायची होती. त्यासाठी मी एकदा बाळासाहेब ठाकरेंना याबद्दल सांगितलं. त्या क्षणी बाळासाहेबांनी मला नवं फाऊंडेशन सुरू करण्यासाठी सांगितलं. यासाठी त्यांनी तातडीने एक स्केचही काढून दिलं होतं.

दोघे वेगळे होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला…
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या वाटा वेगळ्या होण्याची अनेक कारणे आहेत. पण त्यांनी वेगळे होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केले. हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत होते तेव्हा मी त्या दोघांनाही थांबवण्याचा व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही गोष्टी मनात खूप खोलवर गेलेल्या असतात.

बाळासाहेबांनी मला तीन वर्ष वचन दिलं पण…
बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की, तू महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ नकोस. येथे फार गुंतागुंत आहे. तुला राज्यसभेसाठी प्रयत्न करतो. मी कधीच अशी मागणी केली नव्हती. त्यानंतर तीन वर्ष बाळासाहेबांनी मला वचन दिलं. मात्र ते पूर्ण करू शकले नाही. त्यामागे कोण होतं हे मी सांगू शकत नाही.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात