महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : एसटी महामंडळ खरेदी करणार 8,000 नवीन बस — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा

नागपूर : राज्यातील ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच 8,000 नवीन बसेस खरेदी करणार असल्याची मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत केली. शिवसेना (ठाकरे गट) सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले, “एसटी ही उत्पन्न कमावण्याचे साधन नसून राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकांना पोहोचवणारी जनसेवा आहे.”

सरनाईक यांनी माहिती दिली की, पहिल्या टप्प्यात 3,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, दुसऱ्या टप्प्यात 5,000 बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुढील 5 वर्षांत एकूण 25,000 बस टप्प्याटप्प्याने घेण्याची राज्य सरकारची योजना आहे.

महामंडळाच्या कामगारांबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “एसटी कामगारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. 4,190 कोटी रुपयांची थकीत देणी अदा करण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी पुरवणी मागणीतही निधीची तरतूद केली आहे.” त्यांच्या मते, येत्या 6 ते 8 महिन्यांत कामगारांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळाचे डेपो आणि जागा PP मॉडेलवर विकसित करण्यात येतील, या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरले जाईल. महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पर्यायी स्रोत निर्माण करण्यात येत आहेत. 

सरनाईक यांनी स्पष्ट केले की परिवहन विभागाचे उद्दिष्ट डिझेल बसेस कमी करून पर्यावरणपूरक पर्यायी बस (इलेक्ट्रिक/सीएनजी) वाढवण्याचे आहे.

या विषयावरील चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय, भाई जगताप, अनिल परब, प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात