विश्लेषण ताज्या बातम्या

सुनील तटकरेंनी राखली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लाज

X : @vivekbhavsar

मुंबई

तुमचे वय झाले, या वयात राजकारण सोडून घरी बसायचे आणि आमच्या सारख्या तरूणांना मार्गदर्शन करायचे अशी टीका करत काका अर्थात शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी दगाफटका करत मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पाडली आणि भाजप – शिवसेना युती सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामती या स्वत:च्या मतदारसंघातून निवडून आणू शकले नाहीत. त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकमेव उमेदवार रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Lok Sabha constituency) निवडून आल्याने अजित पवार यांच्या पक्षाची लाज राखली गेली आहे.

अजित पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना मावळ मतदारसंघात उमेदवारी दिली होती. तेव्हाही शरद पवार यांनी पार्थच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, अजित पवार पुत्रालाही निवडून आणू शकले नव्हते. यावेळी अजित पवार यांनी काकांशी बंड करून पक्ष फोडला आणि एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde- Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये (Shiv Sena – BJP government) त्यांचा पक्ष सामील झाले. अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे मूळ पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळवले. इतके करूनही अजित पवार यांना त्यांच्या पत्नीला लोकसभेत पाठवण्याचे आणि बहीण सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

अजित पवार यांनी बारामती, शिरूर, रायगड, धारशिव या चार मतदारसंघात उमेदवार दिले होते. तर परभणी मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारी दिली होती. यातील चार उमेदवार पराभूत झाले असून केवळ सुनील तटकरे हे रायगड मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी उद्धव सेनेचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. तटकरे यांना 508352 तर गीते यांना 425568 मते मिळाली. गवळी या अल्पसंख्यांक समाजाचे असूनही तटकरे यांनी 2019 मध्ये तत्कालीन खासदार गीते यांचा पराभव केला होता. यावेळी ही तटकरे यांनी गीते यांना पराभवाची धूळ चारली आहे.

या एकमेव विजयाने अजित पवार यांच्या पक्षाने बंडानंतर लोकसभेत खाते उघडले आहे आणि पक्षाची लाज राखली आहे.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी