महाराष्ट्र ताज्या बातम्या

उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर महाविकास आघाडीचा अविश्वास ठराव

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आल्या असून, त्यामुळे त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधिमंडळ सचिवांकडे अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला. या घडामोडींमुळे गोऱ्हे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. […]