दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटनेनंतर एकत्र उभे असलेले आळंदीतील विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिवेआगर समुद्रात पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

आळंदीतील विनर्स अकॅडमीचे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी आले होते; सर्व आठ मृतदेह सापडले श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर येथे समुद्रात उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विनर्स अकॅडमीतील इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेचे सुमारे 30 ते 40 विद्यार्थी पर्यटनासाठी दिवेआगर […]

पुण्यात १७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद पुणे २०२६ चे आयोजन महाराष्ट्र ताज्या बातम्या

१७ ऑक्टोबरला पुण्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद

विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशनचा पुढाकार; चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजन पुणे  : विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद – पुणे २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात १७ ऑक्टोबर रोजी ही परिषद होणार आहे. या परिषदेसाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन […]

बीड–पुणे रेल्वे 17 सप्टेंबरपासून सुरू होण्याचे नियोजन महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्याच्या विकासाला जोडणार नवी जीवनवाहिनी

१७ सप्टेंबरपासून बीड–पुणे रेल्वे सुरू करण्याचे नियोजन; डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) सेवेसाठीही हालचाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचा हा दिवस बीडवासीयांसाठी आणखी एका महत्त्वाच्या कारणाने विशेष ठरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली बीड–पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा तसेच […]

पुण्यातील जमावबंदी आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांची टीका महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे शहरात जमावबंदी; ही तर सरकारची दंडेलशाही : सुनील माने

पुणे  : ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार होतो. मात्र, या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारने पोलिसांमार्फत पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. ही पोलिसांच्या […]