वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंका दूर करू; गरज पडल्यास मुंबईत बैठक : गणेश नाईक  

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा केली जाईल. शंकांचे समाधान झाले नाही तर मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले.   मुंबई : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून वनविभागाचे उच्च अधिकारी चर्चा करतील. सर्वांच्या सूचना ऐकून शंकांचे निरसन केले जाईल. तरीही समाधान झाले नाही, […]

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विधानसभेत अनधिकृत बाईक टॅक्सींवरील कारवाई आणि कर आकारणीबाबत माहिती देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनधिकृत बाईक टॅक्सींवर कर आकारणी; परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी होणार  

राज्यात चार ते साडेचार लाख अनधिकृत बाईक-टॅक्सी चालक कार्यरत असून, यापुढे अशा बाईक-टॅक्सींवर प्रतिदिन पाच रुपये आणि प्रत्येक फेरीमागे दोन रुपये कर आकारण्यात येणार आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.   मुंबई, मंगळवार : राज्यात सध्या तब्बल चार ते साडेचार लाख अनधिकृत बाईक-टॅक्सी चालक कार्यरत असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप […]

महाराष्ट्र विधानसभेत गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर अश्लील नृत्यांवरील सुधारणा विधेयक मांडताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

ऑर्केस्ट्राच्या नावाखालील अश्लील नृत्यांवरही कारवाईचा मार्ग मोकळा; सुधारणा विधेयक विधानसभेत संमत

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हॉटेल्स, उपाहारगृहे आणि बारमध्ये चालणाऱ्या अश्लील नृत्यांवरही पोलिसांना कारवाई करता यावी, यासाठीचे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले. मुंबई : हॉटेल्स, उपहारगृहे आणि बारमध्ये महिलांच्या अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालणारे महत्त्वाचे सुधारणा विधेयक आज विधानसभेत संमत झाले. ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या […]

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईतील ९९ वर्षांच्या भाडेपट्टाधारक सोसायट्यांना मुद्रांक शुल्कात दिलासा जाहीर केला महाराष्ट्र ताज्या बातम्या

९९ वर्षांच्या भाडेपट्टाधारकांना मोठा दिलासा; मुद्रांक शुल्कात मोठी कपात

मुंबईतील हजारो गृहनिर्माण संस्थांची दशकांपासूनची कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर अथवा कब्जेहक्काने मिळालेल्या जमिनींवरील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्थांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दशकांपासून रखडलेल्या भाडेपट्टा करारांच्या नोंदणीवरील प्रचंड मुद्रांक शुल्काला मोठी कात्री लावत निवासी मालमत्तांसाठी केवळ ०.५ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: विरोधकांचा सन्मान राखा; नाहीतर लोकशाहीचा गाडा अस्थिर होईल : भास्कर जाधवांचा सरकारला इशारा

मुंबई: लोकशाही ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन चाकांवर चालते. विरोधकांचा सन्मान काढून घेतला तर लोकशाहीचा गाडा अस्थिर होईल, असा सडेतोड इशारा Bhaskar Jadhav यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दिला. राज्यपालांच्या अभिभाषणाला आपला विरोध असल्याचे जाहीर करत, राज्यात सध्या लोकांना फसविण्याचे उद्योग सुरू आहेत, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]