महाराष्ट्र ताज्या बातम्या

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंका दूर करू; गरज पडल्यास मुंबईत बैठक : गणेश नाईक  

वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत उत्तर देताना

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा केली जाईल. शंकांचे समाधान झाले नाही तर मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले.  

मुंबई : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून वनविभागाचे उच्च अधिकारी चर्चा करतील. सर्वांच्या सूचना ऐकून शंकांचे निरसन केले जाईल. तरीही समाधान झाले नाही, तर मुंबईत बैठक घेऊन या विषयावर चर्चा करू, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत दिले.

विधानसभा नियम १०५ अन्वये शिवाजी पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. प्रस्तावित कॉरिडॉरमुळे ३७७ गावे बाधित होणार असून, हत्ती, बिबटे आणि गव्यांमुळे स्थानिक नागरिक आधीच त्रस्त आहेत, याकडे पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी — शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही स्थानिक नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणाचा विचार शासनाने करावा, अशी मागणी केली. 

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाचे कोअर क्षेत्र ६००.१२ चौरस किलोमीटर असून, बफर क्षेत्र ५६५.४५ चौरस किलोमीटर आहे. या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ १,१६५.५७ चौरस किलोमीटर इतके आहे. या प्रकल्पाची व्याप्ती सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये असेल. मात्र, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

वनमंत्री नाईक पुढे म्हणाले की, लोकांना उपद्रव होऊ न देता आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. ज्या भागात वाघ नाहीत, त्या भागात वाघांचे स्थलांतर करण्यासंदर्भातील प्रक्रिया लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात