'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; त्यानंतर जयंत पाटील यांनी भेटीमागील कारण स्पष्ट करत महायुती प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (प्रतिकात्मक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम

ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. महाराष्ट्र ताज्या बातम्या

रामटेक देवस्थान विधेयकावर विधानसभेत गदारोळ; ‘राजकीय व्यक्ती विश्वस्त नकोत’, विरोधकांची मागणी

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक २०२६ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या विश्वस्त मंडळात चांगली आणि प्रामाणिक माणसे घ्यावीत, राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्यांना घेऊ नये, राजकीय व्यक्तींना विश्वस्त नेमू नये, अशा मागण्या करत विरोधकांनी शासनाला धारेवर धरले. विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी बाकांवरून शेरेबाजी झाल्याने […]

विधानसभेत हाफकिन बायो-फार्मास्युटिकल महामंडळातील कथित अनियमिततांबाबत कॅग अहवालाचा मुद्दा उपस्थित करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कॅग अहवालातील निरीक्षणांवरून हाफकिनचा मुद्दा विधानसभेत; जयंत पाटील यांची ॲक्शन टेकन रिपोर्टची मागणी

मुंबई : हाफकिन बायो-फार्मास्युटिकल महामंडळातील कथित आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततांचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) अहवालातील निरीक्षणांचा संदर्भ देत सरकारकडे स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली. जयंत पाटील यांनी सभागृहात दावा केला की, पोलिओ लसींच्या वाहतुकीबाबत विमान वाहतुकीची बिले सादर करण्यात आली, मात्र […]

विधानसभेत अतिवृष्टी, 'मिसिंग लिंक' प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर सरकारला प्रश्न विचारताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीवरून जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; ‘मिसिंग लिंक’पासून रस्ते प्रकल्पांच्या गुणवत्तेवर उपस्थित केले प्रश्न

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता, हवामान बदलासाठीचे नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी उपरोधिक शब्दांत सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्न उपस्थित केला. अतिवृष्टीनंतर राज्यातील विविध भागांत समोर आलेल्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबत गंभीर […]

वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंका दूर करू; गरज पडल्यास मुंबईत बैठक : गणेश नाईक  

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा केली जाईल. शंकांचे समाधान झाले नाही तर मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले.   मुंबई : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून वनविभागाचे उच्च अधिकारी चर्चा करतील. सर्वांच्या सूचना ऐकून शंकांचे निरसन केले जाईल. तरीही समाधान झाले नाही, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दावोस परिषदेतील गुंतवणूक फक्त PR Activity नसावी – जयंत पाटील यांची सरकारला टोला

गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात उतराव्यात – जयंत पाटील सांगली : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने महाराष्ट्रासोबत अनेक कंपन्यांनी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल, तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र, […]