मिरॅकल केबल कंपनीतील 259 कामगारांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र परिश्रम संघाचा एल्गार
अंबरनाथ: अंबरनाथ येथील मिरॅकल केबल कंपनीने नियमबाह्य पद्धतीने 259 कामगारांना कामावरून काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र परिश्रम संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले की, या कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याशिवाय कंपनी व्यवस्थापनाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. कंपनीच्या गेटवर झालेल्या द्वारसभेत पवार यांनी कंपनी आणि कामगारांचे हित जपणारी […]