रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सत्तासमतोलाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर रायगडचा ‘गड’ गोगावलेंकडे….; तर नाशिकची ‘कमान’ महाजनांकडे…..!

महायुतीतील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; शिवसेनेचा रायगडवरील दावा कायम, भाजपने नाशिकची ‘राजकीय कमान’ राखली……. मुंबई — साधारण दीड वर्षांपासून प्रलंबित आणि वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकारणात सुरू असलेल्या रस्सीखेचीला सोमवारी अखेर पूर्णविराम मिळाला. आता रायगडचा ‘गड’ शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे, तर नाशिकची महत्त्वाची राजकीय-प्रशासकीय सूत्रे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या हाती देत महायुती […]

महाड MIDCतील Indo Amines कंपनीत वायूगळतीच्या घटनेनंतर कंपनी परिसरात एकत्र आलेले कामगार आणि कर्मचारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड MIDCतील इंडो अमाईन्समध्ये वायूगळती; 36 जण बाधित, एकाचा मृत्यू

एकाची प्रकृती गंभीर; दोन कामगारांना मुंबईत हलविले, Factory Inspector आणि DYSPकडून कंपनीची पाहणी महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी झालेल्या वायूगळतीत सुमारे 36 कामगारांना बाधा झाली असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोन कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीच्या प्लांटमध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडशी संबंधित […]

somnath-ozarde-mahad-ganeshotsav-free-bus-service.jpg महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड मतदारसंघातील १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा

मुंबई, ठाणे, नालासोपारा, पुणे-पिंपरी चिंचवडमधून गावाकडे बस सोडणार; आतापर्यंत २७ बसेसचे बुकिंग — सोमनाथ ओझर्डे Milind Mane महाड : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि उपनगरांतून महाड विधानसभा मतदारसंघातील गावांकडे येणाऱ्या सुमारे १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे हा उपक्रम […]

महाड तालुक्यातील किंजळोली येथे जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडासह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

विनापरवाना तोडलेले सागवानी लाकूड जप्त; महाड वनविभागाची कारवाई

किंजळोलीत धाड; सुमारे चार घनमीटर सागवान ताब्यात, अंदाजे किंमत ₹80 हजार महाड : महाड तालुक्यातील किंजळोली गावाच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या जागेवर विनापरवाना सागवानी वृक्षांची तोड करून लपवून ठेवलेले सुमारे चार घनमीटर लाकूड महाड वनविभागाने शुक्रवारी दुपारी कारवाई करून जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सागवानी लाकडाची अंदाजे किंमत ₹80 हजार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. किंजळोली परिसरात […]

महाड एमआयडीसीतील कथित अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या गैरवापरप्रकरणी पोलीस ठाण्यात निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एमआयडीसीतील अनुदानित निंबोळी-लेपित युरियाच्या कथित गैरवापरप्रकरणी दोषींवर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)ची मागणी

१५ दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा महाड : महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रा. लि. आणि कोपरान रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी-लेपित युरियाचा कथित बेकायदेशीर साठा आणि वापर झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने महाड एमआयडीसी […]

अतिवृष्टीमुळे महाड शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी आणि जलमय झालेला रस्ता. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सावित्री, गांधारी, काळसह उपनद्यांत गाळ काढूनही महाडला पुराचा फटका; जनजीवन विस्कळीत

मुख्य बाजारपेठ जलमय; साहिलनगरमध्ये घर कोसळले, केंबुर्लीजवळ पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली महाड: सावित्री, गांधारी, काळ आणि अन्य उपनद्यांमधील गाळ काढण्याचे काम करूनही यंदाच्या अतिवृष्टीत महाड शहराला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा […]

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड : पालकमंत्रीपदानंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य नियुक्तीवरून वादाची शक्यता?

मुंबई : महायुती सरकारच्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद अजून संपलेला नाही, आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खासकरून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील जुने वाद या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळू शकतात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला होता, जो आता […]