नगरमध्ये भाजपातील संघर्ष उफाळला, 100 पदाधिकारी देणार राजीनामे, काय आहे कारण?
नगर- नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत यापूर्वीच प्रवेश केलाय. त्यांना शरद पवारांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आधीच महायुतीची ताकद कमी झाल्याचं मानण्यात येतंय. त्यातच सुज विखे पाटील यांच्या उमेदवारीला आता भाजपातूनच विरोध होताना दिसतो आहे. […]