ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात, तटकरेंकडूनही शिक्कामोर्तब

मुंबई बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा असताना त्यांच्याच गटाचे नेते सुनील तटकरे यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरेंनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही……!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही X: @therajkaran मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याचा तपास सुरु असल्याने याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सुस्पष्ट […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील 23 जागांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक, जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय?

मुंबई महाविकास आघाडीसह महायुतीनेही अद्याप लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी केवळ अंदाज वर्तवले जात असताना भाजपने राज्यातील २३ जागांसाठी निरीक्षक नेमल्याचं समोर आलं आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठीच निरीक्षक नेमल्याने जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपच्या मिशन ३७० साठी महाराष्ट्रातून मित्रपक्षांसह ४२ हून जास्त जागा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अयोध्या व श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन बांधणार, पण कशासाठी? अंतरिम बजेटवर निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची टीका

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे 2024-25 चे अंतरिम बजेट अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेत सादर केले. अनुसूचित जाती जमातीसाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीशिवाय दुसरं नवीन काही नाही. तर हा अर्थसंकल्प शोषित वंचित समाजाला वंचित ठेवणारा आहे. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे मत निवृत्त सनदी अधिकारी ईझेड खोब्रागडे यांनी व्यक्त केले. वर्ष 2023-24 च्या बजेटमध्ये […]

महाराष्ट्र

मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शासन संवेदनशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran मुंबई: संवादाची, विचारांची, साहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली माय मराठी. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन संवेदनशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिळ्या कडीला ऊत आणणारा अंतरिम अर्थसंकल्प, 99 हजार कोटी राजकोषीय तूट म्हणजे दिवाळखोरीकडे वाटचाल; विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधिमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आज सकाळपासूनच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करीत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ‘राज्यातील शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्गीयांची फसवणूक करणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज राज्य सरकारने सादर केला आहे. विकासाचे दिवास्वप्न दाखवणारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अर्थमंत्री अजित पवारांना सादर केलेला संपूर्ण अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर!

मुंबई : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांनी मांडला अंतरिम अर्थसंकल्प; या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत पवारांनी अर्थसंकल्प वाचनास सुरुवात केली आणि अर्थसंकल्पाचा शेवट कुसुमाग्रजांच्या एका कवितेतून केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा… मुलींसाठी लेक लाडकी योजना

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने महानंद आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबतचा कराराचा मसुदा सार्वत्रिक करण्याची किसान सभेची मागणी

मुंबई : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवून सुद्धा राज्य सरकारने महानंदा एन.डी.डी.बी.ला चालवायला देण्याच्या बद्दलच्या हालचाली तीव्र केल्याचं सांगितलं जात आहे. महानंदाच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला असून महानंदाबाबत एन.डी.डी.बी. म्हणजे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे राज्य सरकारचे मंत्रीच जाहीररित्या सांगत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रस्ताव, राऊतांचा मोठा दावा

मुंबई भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण आणि अजित पवार गटाने घड्याळ चिन्हं चोरलं असलं तरी जनता त्यांना मतदान करणार नाही. याच कारणास्तव जे पी नड्डा यांनी दोघांना आगामी निवडणूक कमळावर लढवण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. […]