उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही
X: @therajkaran
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्याचा तपास सुरु असल्याने याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सुस्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसेभत केलेल्या निवेदनात बोलताना दिली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आल्याचे यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे ती राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, या ग्वाहीचा पुनरुच्चार त्यांनी केला.या प्रकरणाचा मुद्दा आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.