मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत पवारांनी अर्थसंकल्प वाचनास सुरुवात केली आणि अर्थसंकल्पाचा शेवट कुसुमाग्रजांच्या एका कवितेतून केला.
अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा…
- औंधमध्ये एम्स सुरू करण्यात येणार आहे.
- आदिवासी विकास विभागास १५ हजार कोटींचा निधी
- सारथी, बार्टी, महाज्योती यांसारख्या संस्थाना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती आणि इतर सर्व योजनांत एकसंघता आणण्यासाठी धोरण तयार करणार
- बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करणार
- ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना सुरू करणार
- धनगर समाजाच्या उन्नतीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करू देणार
- मदरसा अनुदानात दोन लाखांवरुन दहा लाखांपर्यंत वाढ करणार
- जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार
- अटल सेतू आणि कोस्टल रोडला जोडण्यासाठी दोन बोगद्यांची निर्मिती करणार
- जालना ते नांदेड महामार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद
- नियोजित रस्त्यांसाठी ६ हजार कोटींची तरतूद
- ११ गड-किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव
- शिर्डी विमानतळाचे विस्तारिकरण
- छ. संभाजीनगर येथील विमानतळाचया विस्तारासाठी ५४८ कोटी ४५ लाखांची तरतूद
- नागपूरमधील मिहानसाठी भरीव तरतूद
- राज्यात १८ लघू उद्योग संकुल उभारण्यात येणार
- हर घर नळ योजनेत १ कोटी नळ जोडणीचे उद्दीष्ट्य
- तीन हजार कोटींचा निधी पाणी पुरवठा विभागाला देण्यात आला
- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबुची लागवड करण्यात येणार
- ग्रामविकास विभागाला ९ हजार कोटींची तरतूद
- वनविभागास २ हजार कोटींची तरतूद
- ऊर्जा विभागाला ११ हजार कोटींचा निधी
- शेतकऱ्यांसाठी १ लाख सौरपंपाचे वाटप करण्यात येणार
- शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यात येणार
- राज्यात २ हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार
- ५० ठिकाणी थिम पार्क तयार करणार
- अयोध्या, श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय
- मंगेश पाडगांवकर कवितेचे गाव” उपक्रम- वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिरे, बारवांचे जतन व संवर्धन योजनेसाठी 53 कोटी रुपये
- 12 ज्योर्तिलिंगापैकी एक औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली,साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड जिल्हा नांदेड, एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना
- लोणावळा, जिल्हा पुणे येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प- 333 कोटी 56 लाख किंमत
- लोणार, जिल्हा बुलढाणा, अजिंठा-वेरुळ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, कळसुबाई – भंडारदरा, जिल्हा अहमदनगर, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक तसेच कोकणातील सागरी किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा
- वाशिम,जालना,हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यांतील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय
मुलींसाठी लेक लाडकी योजना
- १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेत मुलींना टप्प्याटप्प्याने १ लाख एक हजार रुपये मिळतील.
- १० शहरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न