ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा : मंत्री मंगल प्रभात लोढा 

X : @NalavadeAnant नागपूर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी आपण कोणतेही चुकीचे काम करत नसल्याचे सांगत, आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान बुधवारी येथे दिले. अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी आज सभागृहात बोलताना पुराव्याशिवाय आरोप केल्यानंतर, काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, ढासळलेली आरोग्य व्यवस्था; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काढले सरकारचे वाभाडे

नागपूर राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्था, मोठया प्रमाणात भ्रष्टाचारात झालेली वाढ आणि ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थे प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाडे काढले. सरकार जनतेच्या मुळावर व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहे. शेतकऱ्यांना विमा अनुदानाव्यतिरिक्त एकही रुपयाची मदत जाहीर केली नाही. विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही पॅकेज दिलं नाही. हे सरकार भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोकरा योजनेतील भ्रष्टाचारात अधिकारी दोषी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

नागपूर शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून एकाच योजनेतून दोनदा लाभ घेतला जातो. अकोला जिल्ह्यात या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारात अधिकारीही दोषी असून यावर कारवाईची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शेततळे, फळबाग, कृषी लागवड, तुषार व ठिबक सिंचन आदीसाठी शेतकऱ्यांना पोखरा योजनेच्या माध्यमातून लाभ होत असतो. अकोला जिल्ह्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

X: @NalavadeAnant नागपूर: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली आहे. गारपीट अवकाळीचा (unseasoned rain) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक फळबाग यांचे नुकसान झालं आहे. […]