ताज्या बातम्या महाराष्ट्र

चांदणी चौकातून भाजपचं तिकीट मिळालं नाही, हर्षवर्धन यांचा राजकारणाला राम राम

नवी दिल्ली गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांच्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी ही माहिती दिली. डॉ. हर्षवर्धन यांनी भाजप आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे आभार मानले. आरएसएस नेतृत्वाच्या विनंतीवरून मी निवडणुकीच्या मैदानात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपकडून तिकीट दिलेले उमेदवार पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

नवी दिल्ली भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांनी बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. आता पवन सिंह यांनी सोशल मीडियावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या पहिल्या यादीतील मुंबईतील 3 उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. यात भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 195 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीत आपल्या अनेक विद्यमान खासदारांना तिकीट न देण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा, भाजपाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाच नेत्याचा समावेश, तिकिट थेट उत्तर प्रदेशातून

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता येत्या 10 ते 15 दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच उमेदवार यादी जाहीर करत भाजपानं कुरघोडी केल्याचं मानण्यात येतंय. देशातील 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील भाजपा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. मात्र महाराष्ट्राचा समावेश या यादीत नाही. मात्र महाराष्ट्रातील एकमेव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभेच्या रिंगणात, तटकरेंकडूनही शिक्कामोर्तब

मुंबई बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा असताना त्यांच्याच गटाचे नेते सुनील तटकरे यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरेंनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकीय पक्ष युवक व वि‌द्यार्थ्यांचे व्होट विकत घेऊ शकत नाही…! – खा. तेजस्वी सूर्या

नागपूर : मागील 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशाचा जो आर्थिक विकास केला, त्यामुळे देशाचे नाव संपूर्ण जगात सन्मानाने घेतल्या जात आहे. स्टार्टअप इंडिया आणि मोदींच्या इतर योजनांमुळे आपला देश जगातील पाचवी मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे, अशा शब्दात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. G20 संमेलनामुळे देशात सर्वच […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपच्या 155 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, लोकसभेसाठी कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंहसह तब्बल १५५ जणांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, अमित शाहांना गांधीनगर, राजनाथ सिंहना लखनऊ, स्मृती इराणी अमेठी, धर्मेंद्र प्रधान यांना ओडिसातील संबलपूर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी म्हणून….’ ; क्लाईड क्रास्टोंचा मोठा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेत एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे आहे. त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी २८ फेब्रुवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘पंतप्रधानच म्हणाले होते शरद पवार माझे राजकीय गुरू’, मोदींच्या यवतमाळ दौऱ्यानंतर राऊतांचा पलटवार

मुंबई : शरद पवार हे सर्वोत्कृष्ट कृषीमंत्री होते, असं पंतप्रधान मोदीच अनेक वेळा म्हणाले आहेत. मोदींनी अनेकदा शरद पवार माझे राजकीय गुरू असल्याचंही विधान केलं आहे. त्यामुळे मोदी आता खोटं बोलत आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी मोदींच्या कालच्या यवतमाळ दौऱ्यानंतर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काल यवतमाळमध्ये सभा झाली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका […]