महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांची स्वतंत्र चूल की भाजपसोबत जाणार? आघाडीकडे चर्चेसाठी ४८ पैकी २६ जागांचा प्रस्ताव सादर

X : @therajkaran मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) लेखी पत्र देऊन महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी २६ जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असे स्पष्ट केले. वंचितने या २६ मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे, पण आता महाविकास आघाडी आमच्यासोबत जागा वाटपाची चर्चा करण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘गरीबांचा पूर्ण पैसा गरीबांना, हीच मोदींची गॅरेंटी’; यवतमाळमध्ये पंतप्रधानांची शरद पवारांसह काँग्रेसवरही टीका

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, पंतप्रधान कृषी सिंचन योजना यासह अनेक योजनांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. यावेळी जनतेशी संवाद साधताना मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. विदर्भ आणि […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

हिमाचलमध्ये काँग्रेस संकटात, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

शिमला : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जयराम ठाकूर यांनी सभागृहाबाहेर ही माहिती दिली आहे. आतापर्यंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आर्थिक नियोजन बिघडल्याने पुरवणी मागण्या फसणार – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

X : @NalavadeAnant मुंबई: प्रत्येक अधिवेशनात सरकारला सातत्याने पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत, यावरून राज्यातील आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ६ लाख २ हजार ०८ कोटी रुपयांचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. तर पावसाळी अधिवेशनात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अर्थमंत्री अजित पवारांना सादर केलेला संपूर्ण अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर!

मुंबई : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जरांगेंचा बोलविता धनी कोण? बैठका कोणी घेतल्या? वॉररूम कुणी स्थापन केल्या? फडणवीस विधानसभेत बरसले!

मुंबई मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. आज दोन्ही सभागृहाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वादग्रस्त चर्चेतून झाली. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जीवे मारण्याचा गंभीर आरोप केला. याशिवाय त्यांनी फडणवीसांविरोधात अपशब्दांचाही वापर केला होता. यावरुन सभागृहात गोंधळ उडाला आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे निर्देश

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. आमदार आशिष शेलारांनी सभागृहासमोर औचित्याचा मुद्दा सादर केला. जरांगेंचा बोलविता धनी कोण?भाजप नेते आशिष शेलार यांनी जरांगेंचा बोलविता धनी कोण, याची सखोल चौकशी करावी. यासाठी एसआयटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नकली बंदुका घेऊन विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर, गोळीबारांच्या घटनांवरुन सरकारला घेराव

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी ते काय घोषणा करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक नकली बंदुका घेऊन दाखल झाले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. ‘गेली शिवशाही आली गुंडशाही’ घोषणाबाजी विरोधकांकडून […]

महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणं झालं ते जाहीर करा’ – नाना पटोले

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या आरोपानंतर जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरुन आता नाना पटोले यांनी राज्य सरकारला एक सवाल उपस्थित केला आहे. ‘हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे […]