शिमला : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जयराम ठाकूर यांनी सभागृहाबाहेर ही माहिती दिली आहे.
आतापर्यंत सुखू यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केलेला नाही. काँग्रेस हायकमांडने त्यांना राजीनामा देण्यास तयार राहण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी काँग्रेस हायकमांडला राजीनामा देऊ केल्याचीही माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखविंदर सिंग हिमाचल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अनुपस्थितीत होते. दुसरीकडे, सध्या सुरू असलेल्या गदारोळात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह एकूण नऊ आमदारांनी सभागृहात प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये तीन अपक्षांचाही समावेश आहे.