यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, पंतप्रधान कृषी सिंचन योजना यासह अनेक योजनांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना मदत देण्यात आली.
यावेळी जनतेशी संवाद साधताना मोदींनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. जेव्हा यूपीए सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती?. तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते, असं म्हणत शरद पवारांच्या कामावर बोट ठेवलं.
आज मी एक बटण दाबलं आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी इतकी मोठी रक्कम पोहोचली. हीच तर मोदींची गॅरेंटी आहे. मात्र काँग्रेसचं शासन असतं तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी खाल्ले असते. काँग्रेसच्या काळत आदिवासींसह अन्य नेत्यांना लाभ मिळत नव्हते. मात्र मोदींच्या काळात लाभ मिळू लागले आहेत.
काँग्रेसच्या काळात दिल्लीतून एक रुपया निघायाचा तेव्हा १३ पैसे लोकांपर्यंत जायचे. मात्र भाजप सरकारने गरीबांचा पूर्ण पैसा त्यांना मिळतो. ३८०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मिळत आहे. हीच मोदींची गॅरेंटी आहे, असं म्हणत मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या कामावर टीका केली.
बंजारा भाषेतून जनतेशी संवाद…
यावेळी पंतप्रधान मोदींनी बंजारा भाषेतून जनतेशी संवाद साधला. मोदी म्हणाले, आता सगळीकडे जनताच म्हणत आहे, अब की बार ४०० पार… लोकसभेत महाराष्ट्रातून महायुतीला ४५ हून अधिक जागा मिळतील असा निर्धार असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.