ताज्या बातम्या राष्ट्रीय

केजरीवालांना सातव्यांदा समन्स, इंडिया ‘आघाडीसोबतची युती तोडणार नाही’; आपचा इशारा

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. केजरीवालांना सातव्यांदा ईडीने समन्स पाठवलं होतं. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. ज्याची सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे. दररोज समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहा. आम्ही इंडिया आघाडीसोबतची युती तोडणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

मुंबई आज राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सकाळी ११ वाजता विधान परिषद तर दुपारी १२ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार आहे. अधिवेशन पुढील पाच दिवस चालणार आहे. उद्या २७ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. दुपारी दोन वाजता सन 2024-25 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आमदार गणपत गायकवाडांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? राज ठाकरेंचा रोख कुणाकडे?

डोंबिवली : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल, याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी केलेल्या या भाष्यानं राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नांदेडचे 55 माजी नगरसेवक भाजपात, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नांदेड नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या ५५ निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. स्वतः चव्हाण यांनीच शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवर फोटो आणि प्रतिक्रिया पोस्ट करून नांदेडच्या राजकारणातली ही मोठी बातमी समोर आणली. त्यानंतर विधानपरिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी याविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, अशोक चव्हाण […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा किती जागांवर होणार विजयी? प्रशांत किशोर यांनी सांगितला हा आकडा

नवी दिल्ली : माजी राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर हे अनेक पक्षांना आणि नेत्यांना विजयी करण्यासाठी ओळखले जातात. सध्या बिहारमध्ये राजकीय आकलन करणाऱ्या आणि संघटनेची बांधणी करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं भवितव्य काय असेल याचा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला किती जागा?येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला १०० चा आकडाही गाठता येणार […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मुरादाबादमध्ये राहुल-प्रियांका यांची एकत्र भारत जोडो न्याय यात्रा, स्वागतासाठी मोठी गर्दी

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आहे. दोन्ही भाऊ-बहीण शनिवारी मुरादाबादमध्ये काँग्रेसच्या यात्रेत एकत्र दिसले. मुरादाबादमध्ये जनतेने मोठ्या संख्येने राहुल आणि प्रियांका यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. पश्चिम यूपीमध्ये न्याय यात्रा सुरू करण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिंदे गट आणि अजित पवार गटाला कमळावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रस्ताव, राऊतांचा मोठा दावा

मुंबई भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण आणि अजित पवार गटाने घड्याळ चिन्हं चोरलं असलं तरी जनता त्यांना मतदान करणार नाही. याच कारणास्तव जे पी नड्डा यांनी दोघांना आगामी निवडणूक कमळावर लढवण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

आसाम सरकारचा मोठा निर्णय, मुस्लीम विवाह आणि घटस्फोटाचा कायदा केला रद्द

गुवाहाटी आसाम सरकारने मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ’23 फेब्रुवारी रोजी आसाम मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि आसाम मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा मागे घेण्यात आला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडी उधळण्याचा भाजपचा दुर्बळ प्रयत्न उघड : आप 

X : @therajkaran मुंबई: अलीकडील घडामोडींमध्ये, आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे. INDIA आघाडीच्या राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडते पुढे असे स्पष्ट झाले आणि त्यामुळे भाजप ने INDIA आघाडी मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत, असा आरोप आम […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपचेही बडे नेते आमच्या संपर्कात : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 

X : @NalavadeAnant मुंबई: भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरु असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढा खेळ खेळायचा आहे तेवढा खेळू द्या, मग आम्ही एकच हातोडा मारू तेव्हा त्यांना कळेल, असा इशारा देण्यास पटोले विसरले नाहीत. जागावाटपावरून […]