ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधींना मोठा झटका, झारखंड HC ने याचिका फेटाळली, आता कनिष्ठ न्यायालयात सुरू राहणार खटला

रांची : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. 2018 मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी केल्याप्रकरणी निकाल देताना राहुल गांधींची याचिका फेटाळली आहे. एमपी-एमएलए न्यायालयाच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती आज उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कारंजा विधानसभेचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या 59 व्या वर्षी निधन

मुंबई : भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी होते. त्यातच आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यांच्या दोन्ही किडण्या काम […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूर हायकोर्टाने मैतेई समाजाच्या आरक्षणाचा परिच्छेद हटवला, जातीय हिंसाचाराचं ठरलं होतं कारण

X: @therajkaran नवी दिल्ली : मणिपूर उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. मैतेई समुदायाचा समावेश अनुसूचित जमाती (ST) मध्ये करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. २७ मार्च २०२३ ची सूचना राज्यात जातीय हिंसाचाराच्या उद्रेकाचं कारण असल्याचे म्हटले जात होते. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यात जातीय हिंसाचाराने उग्र स्वरूप धारण केले होते. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 200 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जिवलग मित्राच्या आरोपानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

जालना किर्तनकार आणि जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे हेकेखोर आहे आणि गुप्त बैठक घेत असल्याचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर केला. यावर जरांगेंनी आपली भूमिका मांडली. अजय बारस्कर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. बारस्करने पैसे घेतल्याचा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरचे माजी गव्हर्नर सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBI चे छापे

नवी दिल्ली माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर सीबीआयने आज (२२ फेब्रुवारी) छापा टाकला. याशिवाय दिल्लीतील अन्य 29 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या राज्यपालपदाच्या काळात एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा केला होता. यापूर्वी 6 […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

हरियाणाच्या शंभू सीमेची तुलना पाक बॉर्डरशी; दिल्लीच्या दिशेने जाण्यास शेतकरी ठाम

नवी दिल्ली केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत कोणताही निकाल न लागल्याने शेतकरी नेत्यांनी बुधवारी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. तेव्हापासून दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दुसरीकडे हरियाणाच्या शंभू सीमेवर गोंधळ सुरूच आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारला आव्हान […]

महाराष्ट्र

निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर

X : @NalavadeAnant मुंबई: राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या […]

महाराष्ट्र

घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे नेमके काय झाले? : कॉँग्रेसचा सवाल 

X : @therajkaran मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आजचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, विशेष अधिवेशनाचा केवळ फार्स’; विरोधकांचं टीकास्त्र

मुंबई आज विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले असले तरी न्यायालयात हे आरक्षण टिकणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यापुर्वी दोन वेळा निवडणुकीच्या तोंडावर असाच प्रयत्न झाला होता. मराठा समाज मागास असण्याला आधार काय? मागास आयोगाने घाईघाईत केलेलं सर्व्हेक्षण, १० टक्के आरक्षणाच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह, ५० टक्क्यांहून अधिकच आरक्षण कोर्टात […]