नवी दिल्ली
केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत कोणताही निकाल न लागल्याने शेतकरी नेत्यांनी बुधवारी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. तेव्हापासून दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दुसरीकडे हरियाणाच्या शंभू सीमेवर गोंधळ सुरूच आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारला आव्हान देत एकतर सुधरा, अन्यथा आम्ही दिल्लीतही येऊ शकतो, असे म्हटले आहे. त्यांनी हरियाणाच्या शंभू सीमेची तुलना पाक सीमेशी केली आहे.
शंभू सीमेवर सुमारे 10 हजार लोकांचा जमाव जमला आहे. त्यांच्याकडे सुमारे 1200 ट्रॅक्टर आणि ट्रॉली आहेत. पोलिसांच्या बॅरिकेड तोडण्यासाठी आंदोलकांकडे 2 प्रो क्लेम मशीन आणि जेसीबी मशीन आहेत. आंदोलकांकडे काठ्या, दगड, लोखंडी ढाल आणि मुखवटेही आहेत, अशी माहिती समोर आली आहे.