ताज्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त, ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद? विरोधकांचा सवाल

पुणे

पुणे पोलिसांनी ड्रग्जविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन ड्रग) जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि दिल्ली येथे अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ‘विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज सापडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला आहे. महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा सुळसुळाट वाढला असून सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे’, असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी  कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातून जवळपास 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये कारवाई केली. पण पुण्यातील ड्रग्जची व्यप्ती आणखी मोठी असल्याचे बोलले जात आहे. तरीही सरकार ड्रगच्या समूळ उच्चाटनासाठी धडक कारवाई करत नाही. सरकार डोळेझाक करत आहे.

राज्यातील तरुणाईला वाचविण्यासाठी ड्रग माफियांचा सरकारने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने धडक कारवाई करून जरब बसविली पाहिजे. अन्यथा हे ड्रग माफिया तरुणाईला देशोधडीला लावतील. सरकारने याकडे डोळेझाक करू नये. ज्यांच्या आशीर्वादाने ड्रग रॅकेट सुरु आहे त्यांच्या देखील मुस्क्या सरकारने आवळल्या पाहिजेत. सरकारने ड्रग प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात