सोयाबीन-कापूस प्रश्नी शेतकरी नेते तुपकरांची आज पियुष गोयलांसोबत बैठक, फडणवीसांचीही उपस्थिती
मुंबई सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलांसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरांची (Farmer leader Tupkar meeting with Piyush Goyal) आज 09 डिसेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी रविकांत तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. बैठकीसाठी तुपकर बुलडाण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले […]









