ताज्या बातम्या महाराष्ट्र

छायाचित्र काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न : चंद्रशेखर बावनकुळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे अशा छायाचित्राच्या आधारावर कोणाला माझी प्रतिमा खराब करता येत नाही. माझ्या कुटुंबाला या माध्यमातून जो त्रास देण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला सतत दौरे करावे लागतात. मी महिन्यातून फक्त एकदा घरी जातो. यावेळी माझ्या कुटुंबाने वेळ मागितला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’ !

Twitter : @therajkaran मुंबई वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर “संविधान सन्मान महासभे”चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने (Constitution of India) या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित – आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेंकडे जुगारासाठी करोडो रुपये कुठून आले? – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबईमहाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, तरुण बेरोजगारीने त्रस्त आहे, महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे. पण सत्ताधारी भाजपाला त्याचे काहीही देणेघेणे नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे मकाऊ येथे जुगार खेळत असल्याचे फोटो मीडिया व सोशल मीडियात दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बावनकुळे जुगार खेळत असल्याचा फोटो […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खबरदार.. आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange – Patil) […]

ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांचे आभार मानताच एकनाथ खडसे झाले ट्रोल

Twitter : @vivekbhavsar मुंबई मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावर उपचार घेत असलेले पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकीय “वेळ” बिघडल्याने गेले दोन वर्षे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या “घड्याळा” सोबत राहून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतेलेले एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल आभार मानले (Eknath Khadse thanked […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

धान भरडाई घोटाळा : फडणवीस समर्थक माजी आमदारामुळे भ्रष्ट कोटलावारला कारवाईपासून संरक्षण

Twitter : @vivekbhavsar मुंबई सरकार, पोलिस यंत्रणा आणि कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्या आणखी एका “डॉन” चे कारनामे “राजकारण” च्या हाती लागले आहेत. हा अधिकारीही धान घोटाळ्यातील एक प्रमुख संशयित आरोपी आहे. गजानन कोटलावार असे याचे नाव असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक होते. धान भरडाईमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

देवेंद्र जी, धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांना आवर घाला!

Twitter : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यातील शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अत्यंत प्रामाणिक आणि चारित्र्यवान म्हणून ओळखले जातात. ते प्रामाणिक असले तरी काही लोक त्यांच्या नावाचा वापर करून दुकान थाटून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस सहसा चिडत नाहीत आणि चिल्लर बाबींकडे दुर्लक्ष करतात. पण, जेव्हा एखाद्या प्रकरणात त्यांच्या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

गणेश मिरवणुकीत बंदूकीतून गोळी झाडणारे सदा सरवणकर सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी

Twitter : @NalavadeAnant मुंबई गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, पोलिसांनीही सांगितले की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती, त्या माहीमचे आमदार सदा सरवणकर यांची मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सदा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयी : काँग्रेसचा दावा

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती (Gram Panchayat election results) जिंकल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, असा दावा करतानाच, भाजपने केलेले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग?

आ.प्रविण दरेकरांचा गौप्यस्फोट Twitter : @NalavadeAnant मुंबई छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) यांचा सट्टेबाजीत सहभाग असून महादेव अँपच्या (Mahadev App) माध्यमातून त्यांना ५०८ कोटी मिळाले आहेत, हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आ. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे विकासाचा दावा […]