ताज्या बातम्या मुंबई

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मनपाने ताब्यात घ्यावे – राजेश शर्मा

Twitter : @AnantNalavade मुंबई अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल (Seven Hills Hospital, Andheri) आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने हे हॉस्पिटल खाजगी कंपनीच्या घशात घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी येथे केली. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. सध्या […]

ताज्या बातम्या

शाळा बंद कराल तर याद राखा – नाना पटोले यांचा इशारा

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा (ZP schools) बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केला असून सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा आहे. तरी, पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) […]

महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदेंचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. मंगळवारी, गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, पाच विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कंत्राटी पद्धतीने भरतीला अधिकारी महासंघाचा विरोध

Twitter : मुंबई बाहययंत्रणेद्वारे १३८ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. राज्य सरकारने हा जीआर तातडीने रदद करावा, अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सोमवारी पत्राद्वारे केली आहे. हा जीआर रद्द न केल्यास राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे […]

शोध बातमी महाराष्ट्र मुंबई

मंत्री रवींद्र चव्हाणांचा डोक्यावर हात; मंत्रालयातील पॉवरफुल सुपे; ८ वर्षांनी बदली; एका दिवसात स्टे आणला

Twitter : @vivekbhavsar मुंबई मंत्रालयीन केडरमध्ये काम करणारे आणि मंत्र्यांशी “खास” संबंध ठेवून असणारे काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी चिटकून असतात तर अनेक अधिकाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली होत असते. अन्न व नागरी पुरवठा विभागात असाच एक पावरफुल सहसचिव दर्जाचा अधिकारी असून मंत्रालयीन अधिकाऱ्यांमध्ये त्यांना “डॉन” या नावाने ओळखले जाते. मधला दीड वर्षाचा अपवाद […]

महाराष्ट्र

46 हजार कोटींहून अधिक विकास कामे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णयTwitter : @therajkaran छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार! – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली असून सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केली.   शेतकरी अस्मानी सुलतानी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

Twitter : @NalavadeAnant मुंबई गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे घेतला. त्यानुसार त्यासंबधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.  मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का ? काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो. पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप नेते व उपमुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी असे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी सकाळी जालना जिल्ह्यातील आंतरावाली-सराटी येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी ठोस ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर जरांगे […]