ताज्या बातम्या राष्ट्रीय विश्लेषण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह तिघांना भारतरत्न, पंतप्रधानांनी ट्विट करत केलं जाहीर

नवी दिल्ली केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर याची घोषणा केली. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राज्यात माहितीच्या अधिकारातील 90 हजारावर अर्ज प्रलंबित, आपले सरकार पोर्टल म्हणजे गाजरच’ वडेट्टीवारांची सरकारवर सडकून टीका

मुंबई सरकारी यंत्रणा पारदर्शी असाव्यात, नागरिकांना सरकारी विभागांतील कामकाजांसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी माहिती अधिकार कायदा, प्रभावी अस्त्र आहे. या कायद्यानुसार एका ठरावीक मुदतीत नागरिकांना माहिती मिळण्याचा हक्क आहे. पण राज्यात 20 हजार 744 इतके तक्रारींचे अर्ज प्रलंबित असून प्रलंबित द्वितीय अपिलांची संख्या 90 हजार 820 इतकी आहे. तर आपले सरकार या पोर्टलवर 93 टक्के तक्रारींचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘दलालांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच; सोयाबीन पिकांची खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्या’; वडेट्टीवारांची मागणी

मुंबई ‘सोयाबीनची खरेदी जागतिक बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये, असे अपेक्षित आहे. परंतू सोयाबीन असो की, इतर पीकांची खरेदी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने केली जात आहे. पण पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे’, अशी परखड […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा काँग्रेसमधून राजीनामा; 48 वर्षांचा प्रवास अखेर थांबवला!

मुंबई लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी गुरुवारी (8 फेब्रुवारी) पक्षाचा राजीनामा दिला. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली. तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि माझ्यासाठी हा 48 वर्षांचा प्रवास महत्त्वाचा आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा विरोध? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेत जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसह पंडीत जवाहरलाल नेहरूंवर आगपाखड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एकदा नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यावर लिहिलं होतं, मला कोणतेही आरक्षण आवडत नाही. विशेषतः नोकऱ्यांमध्ये आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणाऱ्या अशा कोणत्याही पावलाच्या मी विरोधात आहे, ज्यामुळे दुय्यम दर्जाच्या मानकांना चालना मिळते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘भाजप आमदाराकडून गोळीबार, मुख्यमंत्र्यांवरील आरोप यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली’, वडेट्टीवारांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई ‘छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली’ असल्याचा जोरदार हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत 2 दिवस पोलीस कोठडीत, मोदींच्या पोस्टरवर काळं फासल्याचा आरोप

नागपूर युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर काळ फासल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी राऊतांना अटक केली होती. आज सोमवारी सत्र न्यायालयाने कुणाल राऊतांना दिलासा न देता दोन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील कंत्राटदारांना ‘राजकीय भाईगिरी’चा फटका, मारहाणीमुळे कामबंदचा इशारा, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

मुंबई राज्य अभियंता संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांना एक आवाहन करणारं एक पत्र लिहिलं आहे. यात कंत्राटदारांना गावपातळीवर होणाऱ्या भाईगिरीच्या त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक राजकीय मंडळी पैशांसाठी मारहाण करीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकार वाढण्याचं या पत्रकात दिलं आहे. यावर वेळीच कारवाई केली नाही तर फेब्रुवारी-मार्चमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नाना पटोले युतीच्या विरोधात आहेत का? पुंडकरांच्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा

मुंबई महाविकास आघाडीचं ठरलं असं म्हणत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेत्यांची युती तोडण्याची भूमिका असल्यास आघाडी कशी होणार? असा सवाल धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीचा मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या बैठकीत पहिल्यांदाच आंबेडकरांची उपस्थिती; बाहेर आल्यानंतर अशी होती पहिली प्रतिक्रिया

मुंबई महाविकास आघाडीच्या बैठकी आज पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. बैठक संपल्यानंतर बाहेर आल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. मविआतील घटकपक्ष पुढील टप्प्यात जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा करतील. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यात आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा करत आहोत. ही चर्चा आज अर्धवट राहिली. त्यावर पुढील बैठकीत चर्चा […]