ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

राज्यसभेसाठी भाजपकडून 3 नावं जाहीर, शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी

मुंबई आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडूनही मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून तीनच नावं जाहीर केल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. सध्या भाजपने महाराष्ट्रातील तीन नावांची घोषणा केली आहे. यात कालच पक्षप्रवेश झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कोथरूडच्या माजी आमदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

काँग्रेसकडून राज्यात ‘या’ नेत्याला राज्यसभेची संधी; कोण आहे हा नेता?

मुंबई राज्यातील सहा राज्यसभा खासदारांच्या रिक्त झालेल्या जागांची निवडणून येत्या १७ फेब्रुवारीला होणार आहे. सध्याची राज्यातील राजकीय समीकरणं पाहता, यात कोण बाजी मारणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. सहा पैकी पाच जागा महायुतीला तर एक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीकडून अद्याप या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले नसले, तरी काँग्रेसनं त्यांचा उमेदवार जाहीर केलेले आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीच्या निमित्तानं चर्चांना उधाण

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर, आता शरद पवारांसोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेते, काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पुण्यात बोलावली आहे. या बैठकीत विलीनीकरणाची चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या म्हणजेच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस सोडणाऱ्यांना जनताही स्वीकारणार नाही, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचा संताप!

मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल यांनी संताप व्यक्त केला. अशोक चव्हाणांनंतर एकही व्यक्ती काँग्रेस सोडून जाणार नाही. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना जनताही स्वीकारणार नाही. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं, याचं त्यांच्याकडे काहीच कारण नाही. काँग्रेसची नीती चुकीची आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पक्ष प्रवेश तर झाला पण भाजप अंगवळणी पडायला वेळच लागेल, अशोक चव्हाणांच्या तोंडी काँग्रेसच नाव

मुंबई आज अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. भाजपच्या प्रवेशानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत बोलताना अशोक चव्हाण अडखळल्याचं दिसून आलं. पक्षप्रवेशानंतर चव्हाणांनी बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख केला. त्यानंतर आशिष शेलार यांचा उल्लेख करताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अखेर अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, वाजतगाजत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आणि म्हणूनच घरात वारसा असल्याने बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचे जुने व्हिडीओ ट्रेंडमध्ये! विरोधकांनी घेरलं!

मुंबई अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याने आता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. विरोधकांकडून फडणवीसांचे जुने व्हिडीओ समोर आणले जात आहेत. यात एकेकाळी देवेंद्र फडणवीसांनी आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं होतं. आज त्यांचाच भाजप प्रवेश होत असल्याने भाजपवर बोट ठेवलं जात आहे. आदर्श घोटाळा आणि सिंचन घोटाळा कसा झाला यावर बोलतानाचा देवेंद्र फडणवीसांचा एक […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सोनिया गांधी उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार, प्रियांका गांधींनी मात्र नाकारली ‘ती’ ऑफर

नवी दिल्ली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी बुधवारी (१३ फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यापूर्वी ही ऑफर प्रियांका गांधी यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस सरचिटणीस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार, उद्या राज्यसभेचा अर्जही भरणार!

मुंबई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तासात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी १२.३० वाजता पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आता अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का?’

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांची मूट बांधण्याचं काम सुरू असताना पक्षांमधील Out Going थांबवणं अशक्य होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. यावर आता संजय राऊतांनी भीती वाढवणारी शक्यता व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे आता अशोक चव्हाणदेखील काँग्रेसवर दावा […]