Maharashtra Health Minister Prakash Abitkar addresses the Legislative Assembly while responding to a discussion on declaring snakebite a notifiable disease and strengthening public health measures. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्पदंशाविरोधात मोठी पावले; अधिसूचित आजाराचा प्रस्ताव, तज्ज्ञांची राज्यस्तरीय बैठक होणार

मुंबई: राज्यात सर्पदंशाला अधिसूचित (Notifiable) आजाराचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात येईल, तसेच पावसाळी अधिवेशनानंतर केंद्र सरकारच्या तज्ज्ञांसह सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्पदंश प्रतिबंध व उपचार व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. विधानसभा नियम १०५ अंतर्गत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आबिटकर बोलत होते. […]

मुंबई

लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात; बोरीवलीत महिलांची ससेहोलपट 

By Yogesh Trivedi मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारी शिबिरात पैसे घेऊन शस्त्रक्रिया; ग्राम विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात काय सुरु आहे?

जळगाव एका ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सरकारी शिबीरात रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मतदारसंघात घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी पाच सदस्यांच्या समितीचं गठण केलं आहे. […]

विधानसभेत बोलताना विजय वडेट्टीवार. रामटेक देवस्थान विधेयकावर चर्चा करताना विरोधकांनी राजकीय व्यक्तींना विश्वस्त न नेमण्याची मागणी केली. ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गडचिरोली व बुलढाणा येथे प्रसूतीदरम्यान महिलांचा मृत्यू, विजय वडेट्टीवार यांचा सरकावर हल्लाबोल

नागपूर गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेविरोधात अंबादास दानवे ऑक्सिजन मास्क घालून विधीमंडळात

नागपूर राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात आज मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचं आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेथोस्कोप घेऊन तपासणी करणार, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला चिमटा काढला. गळ्यात स्टेथोस्कोप व तोंडाला ऑक्सिजन मास्कमंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी, रुग्णांना नाही औषध गोळी, आरोग्यव्यवस्थेची झाली होळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य खात्यात लाखोंचा भ्रष्टाचार, संजय राऊतांचा आरोप; मंत्री तानाजी सावंत निशाण्यावर

नवी दिल्ली राज्याच्या आरोग्य विभागात लाखोंचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी यासदंर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. दिल्लीत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत माहिती दिली. मी साडेतीन हजार पानांच्या पुराव्यासह आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्यमंत्री एकनाथ […]