ताज्या बातम्या राष्ट्रीय

पंतप्रधानांचे बौद्धिक, सत्तेनंतर 100 दिवसांचा कृती आराखडा; तिसऱ्यांदा जिंकण्यावर भाजप ठाम!

नवी दिल्ली : काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक झाली. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार यावर पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास असून सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतील कृती आराखड्यावर मंत्रीपरिषदेत चर्चा झाली. याशिवाय पुढील पाच वर्षांच्या तपशीलवर कृती आराखडा आणि विकसित भारत : २०४७ या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विजयानंतर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : वंचितकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर, मविआसोबतच्या युतीचं काय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एके ठिकाणी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रण नसल्याचं सांगतात, तर दुसऱ्याच ट्विटमध्ये शरद पवारांनी ६ मार्चला चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचीही माहिती देतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आणि मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. वंचित आणि मविआमध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र 

By Supriya Gadiwan कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती (Shahu Maharaj) अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपकडून तिकीट दिलेले उमेदवार पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार

नवी दिल्ली भोजपुरी अभिनेता पवन सिंह यांनी बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी संध्याकाळी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीत भाजपने बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भोजपुरी स्टार पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. आता पवन सिंह यांनी सोशल मीडियावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या पहिल्या यादीतील मुंबईतील 3 उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. यात भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 195 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीत आपल्या अनेक विद्यमान खासदारांना तिकीट न देण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

नागपूर: आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही 42 मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपच्या 155 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता, लोकसभेसाठी कोण कोणत्या मतदारसंघातून लढणार?

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंहसह तब्बल १५५ जणांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसी, अमित शाहांना गांधीनगर, राजनाथ सिंहना लखनऊ, स्मृती इराणी अमेठी, धर्मेंद्र प्रधान यांना ओडिसातील संबलपूर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा रणसंग्राम : नांदेडमध्ये पुन्हा भाजपचा झेंडा की महाविकास आघाडी खेळणार नवी खेळी?

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर नांदेडमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठा बदल पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नांदेडवर कंट्रोल असलेल्या अशोक चव्हाणांनंतर आता काँग्रेस दुसरा कोणता पर्याय उभा करणार की ही जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षाकडे जाणार याबद्दलची उत्सुकता आहे. भविष्याचे अंदाज बांधण्यापूर्वी आधी इतिहासाकडे डोळसपणे पाहावं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघडीच्या बैठकीला वंचितचे प्रतिनिधी लावणार हजेरी

पुणे : महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा किती जागांवर होणार विजयी? प्रशांत किशोर यांनी सांगितला हा आकडा

नवी दिल्ली : माजी राजकीय रणनीतीकार आणि जनसुराज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर हे अनेक पक्षांना आणि नेत्यांना विजयी करण्यासाठी ओळखले जातात. सध्या बिहारमध्ये राजकीय आकलन करणाऱ्या आणि संघटनेची बांधणी करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं भवितव्य काय असेल याचा अंदाज वर्तवला आहे. काँग्रेसला किती जागा?येत्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला १०० चा आकडाही गाठता येणार […]