महाराष्ट्र ताज्या बातम्या

महसूल विभागाच्या अधिकारात कपात करणारे सुधारणा विधेयक उद्या विधानसभेत; जिल्हाधिकऱ्यांच्या अधिकाराचा संकोच 

मुंबई: नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानसभा विधेयक क्रमांक 97 – महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी आघाडीच्या बहुमतामुळे हे विधेयक 14 डिसेंबरपूर्वी दोन्ही सभागृहांतून मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही आमदारांनी हे विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवावे, अशी मागणी केली आहे. मात्र, सरकार हे विधेयक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुती सरकारची वर्षभरात चौफेर वाटचाल!; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले सरकारचे ‘प्रगती पुस्तक’

मुंबई – “विकसित महाराष्ट्राचा मजबूत पाया रचण्यात महायुती सरकार यशस्वी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याने गेल्या वर्षभरात शाश्वत विकासाकडे मोठी झेप घेतली आहे,” असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राला बळ देत सरकारने बळीराजासाठी तिजोरी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरक्षण मर्यादा भंग प्रकरण : स्थानिक निवडणुकांवर शुक्रवारी निर्णायक सुनावणी

२८ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५० टक्क्यांवरील आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीचा परिणाम स्थानिक निवडणुकांवर तसेच झालेल्या मतदानांच्या निकालांवर थेट परिणाम करू शकतो, म्हणून राज्यातील सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि उमेदवारांचे लक्ष या सुनावणीकडे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मी भाजपचा निष्ठावान सैनिक; 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई — “मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे. येत्या 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात पदावर निश्चितपणे कार्यरत राहीन. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिल्लीला जायचे का, हे ठरेल,” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांसोबतच्या दिवाळी सुसंवादात केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळ्या वातावरणात सहज, विनोदी शैलीत संवाद […]