महाराष्ट्र ताज्या बातम्या

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य…!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ घोषवाक्याचे अनावरण मुंबई — राज्याच्या कृषी विभागाला तब्बल ३८ वर्षांनंतर नवी ओळख मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे आणि ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख उपस्थित होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या विकासासाठी शासनाचा पुढाकार — राज्यमंत्री योगेश कदम

दादर, मुंबई: मुंबईतील प्रत्येक रेल्वे पोलीस बांधवाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार या घरांची उभारणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. मा. कदम यांनी आज दादर (पूर्व) येथील रेल्वे पोलीस वसाहतीला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी वसाहतीची पाहणी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभागांना तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या महामार्गावरील रस्त्यांची स्थिती, कराड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी तसेच साखर हंगामामुळे वाढलेली ऊस वाहतूक या पार्श्वभूमीवर आज सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Sadhu Murder: पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यासाठी ‘धर्मवीर-२’ सरकारला तीन वर्षे का लागली? — सचिन सावंत

भाजपा कार्यालयाच्या जागेचा व्यवहार संशयास्पद; राज्य सरकार आणि बीएमसीने दिला पाहिजे खुलासा मुंबई: भाजपा सरकार सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी करत आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला.ते टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सावंत म्हणाले, “अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि पालघर साधू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Jain Boarding controversy: जैन बोर्डिंग आणि वसतिगृह पूर्ववत होईपर्यंत पाठपुरावा करणार – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग आणि वसतिगृह (Pune Jain Boarding) प्रकरणात राज्य सरकार सकारात्मक आहे. बोर्डिंग आणि वसतिगृह पूर्ववत होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी जैन मुनींना दिलासा देत सांगितले. मॉडेल कॉलनीतील या बोर्डिंगच्या जमिनी आणि मंदिर गहाण ठेवून सुमारे ७० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर जैन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MLA Kisan Kathore : कोकणातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या — आमदार किसान कथोरे यांची मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्य सचिवांकडे मागणी

मुंबई: ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसान शंकर कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. कथोरे यांनी या संदर्भात दोन स्वतंत्र पत्रे पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची तत्काळ कार्यवाही […]

मुंबई

लाडकी बहिण जोरात, गर्भवती महिला धोक्यात; बोरीवलीत महिलांची ससेहोलपट 

By Yogesh Trivedi मुंबई: एका बाजूला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी जोरजोरात डांगोरा पिटला जातोय आणि सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यात दर महिन्याचे दीड दीड हजार रुपये जमा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला गर्भवती महिलांना बोरीवली पूर्व येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून माता व बालक रुग्णालयात आणि तेथून परळच्या राजे एडवर्ड स्मृती बाह्य […]