Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on bhoodubaba Ashok Kharat case and action against superstition महाराष्ट्र ताज्या बातम्या

“भोंदूबाबा खरात प्रकरणात पाळेमुळे खणून काढणार” : फडणवीसांचा इशारा, अंधश्रद्धेविरोधात कडक कारवाई

मुंबई : श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म सीमारेषा ओलांडली जाऊ नये, महाराष्ट्रात भोंदूगिरीला कोणतेही स्थान नाही, असा ठाम संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील संपूर्ण पाळेमुळे खणून काढून कठोर कारवाई करण्याचा निर्धार विधानसभेत व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “श्रद्धा म्हणजे सकारात्मकता, प्रामाणिकता आणि […]

Devendra Fadnavis speaking in Maharashtra Legislative Assembly on Ajit Pawar accident investigation and law enforcement response महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवार अपघातप्रकरणी सखोल चौकशी; घातपात असल्यास दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस  

मुंबई : अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी कोणत्याही प्रकारचा घातपात झाला असल्यास दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भावनिक आणि ठाम भूमिका मांडली.“अजितदादा पवार हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. गेल्या काही वर्षांत आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते,” असे […]

Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on Satara Zilla Parishad election controversy and police action महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातारा ZP निवडणुकीत ‘लोकशाहीचा खून’? पोलिसांवर गंभीर आरोप; विधानसभेत स्फोटक खडाजंगी

मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित हिंसाचाराचे तीव्र पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मतदानापासून सदस्यांना रोखल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत, “मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया विधानपरिषदेत दिली. या प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक […]

Chandrashekhar Bawankule speaking during the Maharashtra Legislative Assembly session in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे बळजबरीच्या धर्मांतराला आळा; बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

मुंबई – राज्यातील बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे अशा कृत्यांवर कठोर कारवाई होईल, असे महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी स्पष्ट केले. या कायद्याचे समर्थन करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख Uddhav Thackeray यांचे त्यांनी अभिनंदन केले. बावनकुळे म्हणाले की, देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच असा कायदा लागू केला असून महाराष्ट्रही आता […]

Wooden barricade repaired near Chhatrapati Shivaji Maharaj Samadhi at Raigad Fort ahead of Raj Thackeray's visit. महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ चिंध्यांनी बांधलेले बॅरिकेटर; राज ठाकरेंच्या भेटीआधीच झाली दुरुस्ती  

महाड  – किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळील लाकडी बॅरिकेटर तुटून त्याला कापडी चिंध्यांनी बांधल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड भेटीपूर्वीच संबंधित बॅरिकेटरची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बॅरिकेटर उभारण्यात आले आहेत. मात्र या बॅरिकेटरला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: मुंबईत बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा सभागृहात; स्थानिक फेरीवाले व कोळी समाजाच्या उपजीविकेचा प्रश्न

मुंबई: बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक मराठी फेरीवाले, कोळी समाज आणि पारंपरिक व्यवसायांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडण्यात आल्याची माहिती आमदार चित्रा किशोर वाघ यांनी दिली. महापौरांच्या भूमिकेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, महापौरांची जबाबदारी केवळ पाणी, मीटर किंवा गटार व्यवस्थेपुरती मर्यादित नसून मुंबईचा सामाजिक व सांस्कृतिक पाया असलेल्या कोळी, आगरी आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे सेनेचा मुस्लिम महापौर… नेमका काय संदेश?

मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ने मुस्लिम समाजातील सय्यद इकबाल यांना महापौरपदी बसविले, तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर म्हणून निवडून आले. मात्र या निर्णयामुळे मराठवाड्यात राजकीय व सामाजिक चर्चांना उधाण आले असून, ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या पारंपरिक मतदारांनाच धक्का दिल्याची भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. परभणीतील मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करताना मुस्लिम महापौराचा विचार […]