महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींनी आधी मतदारयादीचा अभ्यास करावा – महसूलमंत्री बावनकुळे यांचा पलटवार

मुंबई: “राहुल गांधींचे आरोप हे निव्वळ वेडेपण आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही — ती संपूर्ण राज्यभर आहेत. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, ते राहुल गांधींना दिसत नाही का?” असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुबार मुस्लीम मतदारांवर मविआ व मनसे मौन; राज ठाकरे यांनाही ‘व्होट जिहाद’चं दुखणं — आशिष शेलार

8 वर्गीकरणातील मतदार यादी सादर; 31 मतदारसंघांतील 2.25 लाख संभाव्य दुबार मतदारांची BJPची माहिती मुंबई : “राज ठाकरे मराठी, हिंदू आणि भूमिपुत्र मतदारांच्या दुबार नोंदी शोधतात, पण अनेक मतदारसंघात दिसणारे मुस्लीम दुबार मतदार दिसत नाहीत. राज ठाकरे आणि मविआ दोघांनाही ‘व्होट जिहाद’चे दुखणे आहे,” असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मतचोरीतही भाजपाला हिंदू-मुस्लीम दिसते; त्यांच्या बुद्धीची किव करावी वाटते — हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने मतचोरी करून सत्ता मिळवली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “मतचोरीसारख्या गंभीर मुद्द्यातही भाजपाला हिंदू-मुस्लीमच दिसते; त्यांची ही मानसिकता पाहून दया वाटते,” अशी टीका त्यांनी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “मतचोरीचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस व राहुल गांधींनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : महापालिका निवडणुकीत विधानसभा मतदान केंद्रे कायम ठेवावीत — आमदार पराग शाह यांची मागणी

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर (पूर्व) विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग शाह यांनी नागरिकांच्या सोयीसाठी विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती, तीच व्यवस्था आगामी महापालिका निवडणुकीतही कायम ठेवावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. शाह यांनी म्हटले की, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आणि जास्त मतदारसंख्या असलेल्या इमारतींमध्ये मतदान केंद्रे ठेवण्यात आल्याने मतदारांना मोठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंची निवडणूक-पूर्व रणनीती? निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांच्या सार्वजनिक वक्तव्यांवर ‘मर्यादा’ आणली?

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान होण्याचे संकेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या सार्वजनिक वक्तव्यांवर संयम ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मराठी अस्मिता आणि मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्धिष्टासाठी उद्धव ठाकरे आणि राज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मी भाजपचा निष्ठावान सैनिक; 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई — “मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान सैनिक आहे. येत्या 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात पदावर निश्चितपणे कार्यरत राहीन. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिल्लीला जायचे का, हे ठरेल,” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांसोबतच्या दिवाळी सुसंवादात केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मनमोकळ्या वातावरणात सहज, विनोदी शैलीत संवाद […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Tribal Reservation: आदिवासी आरक्षणात घुसखोरी खपवून घेणार नाही – आमदार विलास तरे

पालघर: “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं! (Reservation is our Right not anyone’s Legacy)” — या घोषणांनी आज पालघर शहर दणाणून गेले. आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती (Adivasi Reservation Bachao Kriti Samiti) च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘जन आक्रोश विशाल मोर्चा (Palghar Adivasi Reservation Protest Rally)’ मध्ये जिल्हाभरातील लाखो आदिवासी बांधव सहभागी झाले. या मोर्चाचे नेतृत्व […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nathuram Godse : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना ‘नथुराम गोडसे’ची धमकी; जयंत पाटील, सुप्रिया सुळे, सत्यजीत तांबे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्रातील संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना ‘तुमचा नथुराम गोडसे करू का?’ अशी धमकी एका तथाकथित कीर्तनकाराने व्हिडिओद्वारे दिली. या घटनेने संतपरंपरेच्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी […]

विश्लेषण महाराष्ट्र

…तर शिंदे याची शिवसेना फुटायला वेळ लागणार नाही!

X : @vivekbhavsar महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कौल दिलेला आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नऊ जागा जास्त देत भाजपला स्पष्ट बहुमताच्या जवळ आणून ठेवले आहे. भाजपचे स्वतःचे 132 आमदार आणि पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा याशिवाय 41 उमेदवारांना जिंकून आणलेल्या अजित पवारांच्या (Ajit […]

ताज्या बातम्या मुंबई विश्लेषण

Assembly Election : भाजप देणार चौघांना नारळ; घाटकोपर पश्चिमेतून निष्ठावंतांना तिकीट मिळेल का? 

X : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Assembly election) भारतीय जनता पक्ष (BJP) मुंबईतील काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापणार आहे. यात प्रामुख्याने तीन नावे चर्चेत आहेत. या तीन मध्ये तमिळ सेल्वन, पराग शहा आणि राम कदम या तीन आमदारांचा समावेश आहे. या तीन ठिकाणी पर्याय उमेदवार कोण असेल याबाबत भाजपने स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र […]