महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : “मुंबई चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरच महायुती सरकारची वाटचाल सुरू राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील, अशी ठाम ग्वाही त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : “आता खिशात पैसे नसताना १.८ लाख कोटींच्या पुरवणी मागण्या; चिंता वाढवणारी स्थिती” — जयंत पाटील

नागपूर – “मी नऊ वर्ष अर्थमंत्री होतो. तेव्हा १० हजार कोटींच्या वर पुरवणी मागण्या गेल्या तरी अंगावर काटा यायचा. पण आता खिशात पैसे नसताना तब्बल १ लाख ८० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत,” अशी तीव्र चिंता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींच्या पुनर्विकासाला गती; नियमावलीत फेरबदल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर – मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या, धोकादायक चाळी आणि वस्त्यांच्या पुनर्विकासाला आता झपाट्याने गती मिळणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कापड गिरण्यांच्या जमिनीवरील बहुसंख्य चाळी अत्यंत जर्जर स्थितीत असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा तातडीने पुनर्विकास आवश्यक आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मराठवाड्यातील ७६ तालुक्यांतील सत्तर हजार कुटुंबांना मालकीहक्काचा मार्ग मोकळा; ‘हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द’ (सुधारणा) विधेयक विधानसभा एकमताने मंजूर

नागपूर – मराठवाड्याच्या ७६ तालुक्यांतील सुमारे सत्तर हजार निवासी कुटुंबांना मालकीहक्काचा मार्ग मोकळा करणारे महत्वाचे ‘हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करणे (सुधारणा) विधेयक २०२५’ आज विधानसभेत एकमताने संमत झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. बावनकुळे म्हणाले की या विधेयकामुळे ७ लाख ४३ हजार हेक्टर जमिनींवर वसलेल्या निझामशाही काळातील मदतमास (देवस्थान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : फक्त ३६% खर्च, सव्वा लाख कोटींच्या पुरवणी मागण्या; सरकारने आणखी दोन लाख कोटी काढावेत का? — जयंत पाटील यांचा उपरोध

नागपूर – “अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी फक्त ३६ टक्के खर्च झाला आहे… आणि तरीही आतापर्यंत सव्वा लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या आहेत. मार्च २०२६ पर्यंत आणखी मागण्या होतील. तर मग खर्च भागवण्यासाठी सरकारने आता आणखी दोन लाख कोटी रुपयांचा खर्च काढावा का?” — असा मर्मभेदी टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी अर्थमंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धान उत्पादकांना न्याय हवा; चंद्रपूरला कृषी विद्यापीठाची मागणी — मुनगंटीवारांचे विधानसभेत सरकारला खडे बोल

नागपूर – “आपण पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य होतो… त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,” अशी ठाम मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करताना केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “चार दिवस विदर्भाचे मीठ खाल्ले… त्या मिठाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Khadse : भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा दणका; दोषमुक्तीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला — मंत्रीपदाचा गैरवापर व बेनामी व्यवहाराचे पुरावे ठोस

मुंबई: भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायालयाने त्यांचा दोषमुक्त करण्याचा अर्ज 9 डिसेंबर 2025 रोजी फेटाळला असून, या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल केलेले गुन्हे योग्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : “लाडक्या बहिणींना अडवले ते तुम्ही; योजना बंद करण्यासाठी कोर्टातही तुम्ही गेलात”— उपमुख्यमंत्री शिंदे  

नागपूर : हिवाळी अधिवेशनात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत करारी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “योजना सुरू होताच तिला ‘फसवी घोषणा’ म्हणणारे तुम्हीच. इतकेच नाही, योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले तेही तुमचेच नेते. वडपल्लीवार कोर्टात गेले नव्हते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : हिवाळी अधिवेशन संपताच 29 महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा धडाका?

राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; 10 डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरला संपताच महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केव्हाही होऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांकडून संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला जोरदार गती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी […]

मुंबई ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबई मनपा शाळांचे खासगीकरण: विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मोठा गदारोळ

उत्तरांवर सदस्यांचे समाधान नाही; अध्यक्ष नार्वेकर यांचे स्पष्ट निर्देश नागपूर – मुंबई महानगरपालिका शाळांचे खासगीकरण या संवेदनशील मुद्द्यावर आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात जोरदार चर्चा झाली. राज्य मंत्री, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उत्तरांनी सदस्य समाधानी नसल्याने सभागृहात क्षणोक्षणी तणाव वाढला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना स्पष्ट निर्देश देत म्हटले—“उत्तर […]