Editorial illustration depicting Maharashtra’s financial position with Vidhan Bhavan, stacks of budget documents, a treasury vault filled with currency, infrastructure projects and welfare beneficiaries, symbolising the state’s ₹97,706 crore supplementary demands. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या; राज्याच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह?

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने तब्बल ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि वित्तीय व्यवस्थापनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने उलटत असताना इतक्या मोठ्या अतिरिक्त निधीची गरज भासल्याने विरोधकांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वित्त विभागाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनानुसार, या पुरवणी मागण्या […]

Police personnel detain farmer protesters near Gateway of India in Mumbai during a demonstration supporting Ravikant Tupkar’s demand for complete farm loan waiver. महाराष्ट्र ताज्या बातम्या

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे मुंबईत पडसाद; गेटवेजवळ शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, मंत्रालयासमोर झाडावर चढून निदर्शने

मुंबई, १८ जून: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवारी मुंबईत विविध ठिकाणी शेतकरी आंदोलने करण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाजवळ काही आंदोलकांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले, तर मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने झाडावर चढून निदर्शने केली. रविकांत तुपकर यांनी संपूर्ण कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि इतर शेतकरी मागण्यांसाठी १५ जूनपासून बुलढाणा येथील […]

Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam addressing the media amid political developments involving MPs from the Uddhav Thackeray faction, symbolising leadership crisis and political realignment in Maharashtra. महाराष्ट्र ताज्या बातम्या

६ खासदारांच्या हालचालींमागे असंतोष; नेतृत्वावरील विश्वास उडाला की लोकप्रतिनिधी स्वतःचा मार्ग निवडतात : संजय निरुपम

मुंबई : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या कथित हालचालींवर प्रतिक्रिया देताना, पक्षातील असंतोष आणि नेतृत्वावरील विश्वास कमी होणे हीच अशा घडामोडींची मुख्य कारणे असल्याचा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र […]

Six MPs walking under enhanced Y Plus security cover with armed security personnel, Maharashtra Vidhan Bhavan and Indian Parliament in the background, symbolising political realignment and security concerns in Maharashtra politics. महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांना वाय प्लस सुरक्षा; गृह विभागाचा आदेश

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या शिफारशीनंतर सुरक्षा वाढविण्याचा निर्णय मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांना राज्य सरकारने वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश १७ जून रोजी जारी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी जारी केलेल्या SID-VS/ALL/6MPs/NEW LOCALSEC/2026/5502 या आदेशानुसार यवतमाळचे खासदार […]

Political discussion erupts after Eknath Shinde's name was reportedly omitted from a Navi Mumbai government event invitation महाराष्ट्र ताज्या बातम्या

निमंत्रण पत्रिकेतील वादाचा मंत्रिमंडळातही पडसाद? शिंदे समर्थक मंत्र्यांची नाराजी चर्चेत

नवी मुंबईतील कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळल्याच्या प्रकरणावर सरकारमध्ये खदखद असल्याची चर्चा मुंबई : नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याच्या वादाचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेनंतर शिवसेना नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही […]

Empty Leader of Opposition seat during Maharashtra Monsoon Session amid debate over parliamentary balance महाराष्ट्र ताज्या बातम्या

विरोधी पक्षनेत्याविनाच पावसाळी अधिवेशन; संसदीय संतुलनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी पावसाळी अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष लागले असताना एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत अधिकृत विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने यंदाचे अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडण्याची चिन्हे आहेत. लोकशाही व्यवस्थेत सरकारला उत्तरदायी धरणे, धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे सभागृहात मांडणे यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची मानली […]

Jayant Patil raises concerns over smart meter complaints and electricity bills during meeting with Chief Minister Devendra Fadnavis महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रकल्पाच्या फेरआढाव्याची मागणी

मुंबई: राज्यातील स्मार्ट मीटर प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाने आता राजकीय स्वरूप धारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले, दंड आकारणी आणि ग्राहकांवर होत असलेल्या कथित आर्थिक परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यातील अनेक भागांत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलांमध्ये अनपेक्षित वाढ […]

Eknath Shinde amid political speculation over BJP tensions and possible future equations with Shiv Sena UBT in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर-२’ची चर्चा; भाजप-शिंदे तणावातून नव्या राजकीय समीकरणांची कुजबुज?

मुंबई : महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र अधिकृतरीत्या रंगवले जात असले, तरी सत्तेच्या पडद्यामागे वेगळ्याच राजकीय घडामोडी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेत वाढती अस्वस्थता असल्याचे बोलले जात असून, त्यातून भविष्यात नव्या राजकीय समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून होत असल्याची कथित […]

Shiv Sena leader Sanjay Nirupam addressing a press conference on the Nashik TCS case and demanding a probe into alleged international links. महाराष्ट्र ताज्या बातम्या

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणाला आंतरराष्ट्रीय कनेक्शन?; झाकीर नाईक आणि एमआयएम नेत्यांच्या चौकशीची संजय निरुपम यांची मागणी

मुंबई: नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषण प्रकरणाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले असून, या प्रकरणामागे मलेशिया आणि पाकिस्तानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत असण्याची शक्यता असल्याचा दावा शिवसेना उपनेते आणि पक्ष प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे. सोमवारी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम यांनी न्यायालयात दाखल करण्यात […]

महाराष्ट्र विधानभवन, आचारसंहितेचे प्रतीकात्मक दस्तऐवज, कर्जमाफी आणि शैक्षणिक सवलतींसंबंधी सरकारी फाइल्स दर्शविणारे संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेतच मोठ्या घोषणा कशा?: अनंत गाडगीळ यांचा सवाल  

मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा आणि नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर कसे करण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना […]