महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित; सरकारने दिलदारपणा दाखवून तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी : जयंत पाटील

NCP (Sharad Pawar) MLA Jayant Patil speaking in the Maharashtra Legislative Assembly during the discussion on supplementary budget demands, raising concerns over the state’s farm loan waiver policy and farmers’ welfare.

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नसून, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी घालण्यात आलेल्या निकषांमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. सरकारने दिलदारपणा दाखवत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना जयंत पाटील म्हणाले की, २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात महसुली तूट १ लाख ५३ हजार ६८१ कोटी रुपये दाखविण्यात आली होती. मात्र चालू अर्थसंकल्पात ही तूट केवळ ३७ हजार ५५ कोटी रुपये दाखविण्यात आली आहे. उर्वरित रक्कम खर्च झाली नाही का? जर खर्चच झाला नसेल, तर पुन्हा पुरवणी मागण्या कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

छत्रपती संभाजीनगर येथे शेतकरी प्रश्नांवर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चाचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावरही टीका केली. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या अटींची पूर्तता अनेक शेतकऱ्यांना करणे शक्य नसल्याचे सांगत, “ज्यांना सर्वाधिक मदतीची गरज आहे, त्यांनाच सरकार योजनांच्या बाहेर ठेवत आहे. ही कर्जमाफी आहे की शेतकऱ्यांची पात्रता परीक्षा?” असा टोला त्यांनी लगावला.

“ना कर्जमाफी, ना प्रोत्साहनपर अनुदान” अशा दुहेरी फटक्याला शेतकरी सामोरे जात असल्याचे सांगत, कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी त्यांनी केली.

पीकविमा योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमा कंपन्यांचाच अधिक फायदा होत असल्याचा आरोप करत, ७२ तासांच्या आत तक्रार नोंदविण्याची अट ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अव्यवहार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक गावांत वीज व मोबाईल नेटवर्क नसताना शेतकरी ऑनलाईन तक्रार कशी नोंदवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधताना जयंत पाटील म्हणाले की, यंदा राज्यात सुमारे २७४ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मात्र सरकारचे खरेदीचे उद्दिष्ट केवळ २ लाख मेट्रिक टन, म्हणजेच एकूण उत्पादनाच्या फक्त ०.७३ टक्के आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा कसा मिळणार, असा सवाल करत त्यांनी सरकारला “गप्पा मारण्यापेक्षा दिलदारपणा दाखवा” असा खोचक सल्ला दिला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात