मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणी मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले; संशय वाढल्याचा आरोप

मुंबई/बारामती: राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar died in plane crash) यांच्या विमान अपघाताच्या दिवशीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने (DGCA) माहिती अधिकारांतर्गत देण्यास नकार दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन संजय यादव (RTI activist Nitin Yadav) यांनी केला आहे. यादव यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ ते सकाळी ९ […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादा बंगल्यातून विमानतळावर निघाल्याचे सीसीटीव्ही फूटेज मुख्यमंत्र्यांकडे का मागितले नाही?

अजितदादांच्या विश्वासू नेत्याचा पक्षातील नेत्यांनाच रोखठोक सवाल मुंबई – “आम्हीही आमचं दैवत गमावलं असताना, दुर्दैवाने शरदचंद्र पवार गटाकडून (Sharad Pawar faction of NCP) या घटनेवर राजकारण केलं जात आहे,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (NCP Spokesperson Anand Paranjape) यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्याच पक्षातील अजितदादांचे विश्वासू व ज्येष्ठ नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, परांजपे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule: कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी नेमण्यात आलेल्या खारगे चौकशी समितीचा अहवाल अद्याप सीलबंद असून, त्याचे सविस्तर वाचन केल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. पुढील आठवड्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू होत असल्याने हा अहवाल अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करत बावनकुळे म्हणाले की, “हा अहवाल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

RS Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठीही त्याच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Neelam Gorhe: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या यूके अभ्यासदौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या कार्यपद्धतीबरोबरच Commonwealth Parliamentary Association (CPA) यांच्या बार्बाडोस येथे झालेल्या परिषदेत चर्चिलेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Tipu Sultan: टिपू सुलतान नावाच्या वादावर काँग्रेस–भाजपा आमने-सामने; सचिन सावंतांचा अमित साटम यांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: काँग्रेसचे प्रवक्ते Sachin Sawant यांनी भाजप मुंबई अध्यक्ष Ameet Satam यांच्या ट्वीटवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमचा टिपू सुलतानला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही राहणार,” असा दावा साटम यांनी केला होता. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत यांनी साटम यांच्यावर इतिहासाचे विकृतीकरण आणि दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. सचिन सावंत यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

टिपू सुलतान नावावरून भाजपाचा दुटप्पीपणा; सचिन सावंत यांचा आरोप

भाजपानेच पूर्वी ठराव, नामकरणे आणि गौरव केले होते, असा दावा मुंबई: टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पक्षचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाचा अजेंडा उघड झाल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. भाजपानेच पूर्वी विविध ठिकाणी टिपू सुलतान यांच्या नावाचे ठराव मांडले, रस्त्यांना नावे दिली आणि नेत्यांनी गौरवोद्गार काढले होते, असे उदाहरणांसह सावंत […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजितदादा एकनिष्ठ मंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीतच षडयंत्राची सुरुवात?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे कुणाकडे जाणार, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अजितदादांच्या पत्नी व विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी द्यावी, यासाठी दबाव निर्माण करणारे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच आता पक्षांतर्गत राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास सार्थ ठरवू!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीने विजयाची हॅट्रिक करून विक्रमच केला आहे. सुरुवातीला नगरपरिषद आणि नगरपंचायती, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका—अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीनही निवडणुकांत दणदणीत विजय मिळवून महायुतीचा भगवा दिमाखात फडकवला आहे. या निवडणुकीत जनतेने शिवसेनेला सुद्धा भरघोस मते दिली आणि आमच्यावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पाच दिवसांपूर्वी… मराठवाड्याचा शेवटचा दौरा

By  डॉ. अभयकुमार दांडगे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ते नांदेड विमानतळावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री येण्यासाठी विलंब होत असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील […]