महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठीद्वेष्ट्या काँग्रेसबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी – आशिष शेलार

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉँग्रेसने मुंबईत जे अकरा उमेदवार दिले आहेत त्यातील केवळ दोनच उमेदवार मराठी आहेत. इतका पराकोटीचा मराठीद्वेष दाखवणाऱ्या कॉँग्रेसबद्दल आपली भूमिका काय आहे, हे स्पष्ट करा, असे आव्हान मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. ॲड. आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना सोमवारी दिले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. शेलार बोलत होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर काढले अन्यथा १५ वर्ष ते प्रकल्प पूर्ण झाले नसते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

विकास आणि कल्याणकारी योजना हा आमचा अजेंडा   मुंबई: कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो ३, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले अन्यथा १५ वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरळीमधील निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अन्नमित्रने शेकडो गरीबांची दिवाळी केली गोड 

मुंबई: नेहमीच गरीब गरजू आणि भुकेल्यांना आपुलकीचे आणि प्रेमाचे दोन घास देणार्‍या सौरभ मित्र मंडळाच्या ‘अन्नमित्र’ सत्कार्याने टाटा रुग्णालय परिसरात ३०० गरीब, गरजूंसह कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली.  सौरभ मित्र मंडळाच्या अन्नमित्र उपक्रमाच्या माध्यमातून गेली चार वर्षे केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या परिसरात गरीब, गरजू आणि भुकेल्यांना अन्नदान केले जात […]

महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवण्याचे शरद पवार यांचे संकेत 

इंदापूर (पुणे): निवडणुकीत मला स्वत:ला उभं राहायचं नाही. जनतेने मला 14 वेळा निवडून दिले. त्यातल्या सात वेळा इंदापूर तालुक्यातील जनतेने मला मतं दिली. त्यामुळे आता मला स्वत:साठी काहीच मागायच नाही. मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलायचं आहे. हे करायचं असेल, तर ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन आहे अशाही लोकांची गरज आहे. त्याची पूर्तता […]

महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीने जागतिक झेप घ्यावी : सांस्कृतिक मंत्र्यांचे आवाहन 

X : @NalawadeAnant मुंबई – आमचे सरकार नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीच्या पाठीशी ठामपणे उभे असून मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक झेप घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते दर्जेदार मराठी चित्रपटांना अनुदान वाटपाच्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलत होते.  ते म्हणाले, मुंबई, कोल्हापूरप्रमाणे लवकरच नागपूरमध्ये सुद्धा १५० एकर जागेमध्ये फिल्म सिटी तयार करण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांचे आभार X : @therajkaran मुंबई राज्यातून उद्योग बाहेरील राज्य खासकरून गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा खोटा प्रचार (False Narrative) विरोधी पक्ष करत असले आणि तसा चुकीचा नरेटिव्ह पसरवत असले तरी ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण परकिय गुंतवणुकीच्या (FDI) ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. हि अत्यंत आनंदाची बातमी आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धैर्यशील पाटलांच्या खासदारकीमुळे रायगडात भाजपचे आमदार वाढणार! – प्रवीण दरेकर यांना विश्वास  

X : @MilindMane70 महाड – दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होईल असा विश्वास विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे. प्रवीण दरेकर रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर असताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला

X : @NalawadeAnant मुंबई – काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका केली जात होती. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले असले तरी पुढील लढाई सोपी नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly election) विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे, लोकसभा (Lok Sabha election) जिंकलो म्हणून गाफील राहू नका, असा इशारा देतानाच विधानसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या : विरोधी पक्ष नेत्यांची मागणी

X : @therajkaran मुंबई – सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला (Gold medalist Rahi Sarnobat) वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद (Martyr Major Anuj Sood) यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी, अशी  मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.  पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मुद्याआधारे वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. वडेट्टीवार म्हणाले, सुवर्णपदक […]

शोध बातमी ताज्या बातम्या

दहा हजार कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा?; संशयाची सुई मुख्यमंत्र्यांच्या दिशेने?

X : @vivekbhavsar भाग – पहिला मुंबई अपघात, आग, पूर, बॉम्बस्फोट, हृदयविकार, प्रसूती, सर्पदंश यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महाराष्ट्रात 2014 मध्ये सुरू झालेल्या 108 ॲम्बुलन्स सेवा पुरवठादाराचा कालावधी पाच वर्षानंतर समाप्त होतो, मात्र नवीन पुरवठादार निवडला जात नाही, तोपर्यंत त्यालाच आधी दोन वर्षांची, पुढे तीन वर्षांची आणि शेवटी 30 जून 2024 […]