नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर राहुल गांधी यांच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह रचून बदनाम करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, संसदेत झालेल्या घटनेचा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही, आणि गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे.
पटोले म्हणाले की, भाजप राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेची लोकप्रियता सहन करू शकत नाही, म्हणून खोट्या कथा रचून अपप्रचार केला जातो. तसेच, भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा समावेश होता, या मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी फडणवीस यांना अकार्यक्षम गृहमंत्री म्हणत हल्लाबोल केला.
मुंबई काँग्रेस कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने विधानभवनात जोरदार घोषणाबाजी केली.