ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या पुण्यात तोफ धडाडणार

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला पाठींबा दिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांची तोफ उद्या पुण्यात (pune )धडाडणार आहे .भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ त्यांची उद्या पुण्यातील सारसबाग परिसरात सायंकाळी 6 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या आधी त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या मनसेकडून समन्वयक समिती जाहीर ;अमित ठाकरे ,बाळा नांदगावकरांचा समावेश

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे .त्यानंतर आता मनसेत हालचालींना वेग आला असून मनसेकडून महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारासाठी समन्वयक समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत मनसेचे नेते, सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष यांचा समावेश आहे.यामध्ये. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘सन्मान दिला तरच महायुतीचा प्रचार करा’, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना काय आदेश, पंतप्रधान मोदींकडे काय केल्यात मागण्या

मुंबई- गुढपीढव्याच्या सभेत महाययुतीला जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षात आणि बाहेर उसळलेल्या वादळानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी मनसेचे नेते, सरचिटणीस, विभाग प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन राज यांनी निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केलीय. या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार का उभी करणार नाही, यावरही त्यांनी सभेत याबाबतची भूमिका स्पष्ट केल्याचं सांगितलंय. प्रचारात सहभागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नसते तर राममंदिर उभं झालंच नसत ; राज ठाकरेंकडून कौतुक

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात महायुतीला (MahaYuti)बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे . त्यानंतर आज मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर या लोकसभेसाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज ठाकरेंना पुन्हा धक्का ; कीर्तिकर शिंदेनंतर डोंबिवलीतील 7 पदाधिकाऱ्यांचाही मनसेला रामराम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी गुडीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षातून धक्यावर धक्के बसत आहेत . त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी पसरली आहे . याआधी मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीतील (Dombivli) मनसेचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का ; कीर्तिकुमार शिंदेचा मनसेला रामराम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला( mahayuti )बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने मनसेच्या शिलेदाराने त्यांची साथ सोडली आहे . मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचा हात धरताच राज ठाकरेंना पक्षातून मोठा धक्का बसला आहे . मनसेने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरेंना अमित शाहांनी कोणती फाईल दाखवली? संजय राऊत यांची कडवट टीका, नमोनिर्माण पक्ष म्हणून टीकास्त्र

मुंबई- राज ठाकरे आणि अमित शाहा यांच्या भेटीत अशी कोणती फाईल राज यांना दाखवण्यात आली की त्यामुळं मुंबईत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे गेले, तसंच काही या प्रकरणात नाही ना, असा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हुजरेगिरी, व्यभिचार…’, राज ठाकरेंच्या सभेनंतर मविआकडून जोरदार टोलेबाजी

मुंबई : राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात केवळ मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या भाषणानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या भूमिकेचं भाजप आणि महायुतीतील इतर घटक पक्षांकडून स्वागत केलं जात असताना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र यावर टीका केली जात आहे. २०१४ मध्ये राज ठाकरेंनी मोदींविरोधात टोकाची टीका केलेले व्हिडिओही सध्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अलविदा मनसे’, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पहिलाच धक्का, या बड्या पदाधिकाऱ्याने दिला पदाचा राजीनामा

मुंबई- राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, आता पक्षात चलबिचल सुरु झाल्याचं दिसतंय. राज ठाकरे यांच्या निर्णयाचा कोणताही फायदा मराठी माणसांना होणार नाही, असं सांगत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राज ठाकरे यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही, असंही शिंदे म्हणालेले आहेत. याबाबत कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करुन राजीनामा दिला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, शाहा-राज यांच्या भेटीत नेमकं काय घडलं होतं?

मुंबई– राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात, अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे. विधान परिषद आणमि राज्यसभेची जागा नको, असं सांगत बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी जाहीर केला असला तरी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीकडून त्यांची मोठी अपेक्षा असेल, याचे संकेत त्यांनी दिलेत. पक्ष […]