जोगेश्वरी येथे “बिराड मोर्चा”वर पोलिसांचा लाठीचार्ज, शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण
मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील सुभाष रोड लगत रेल्वे रेषांच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आज सकाळी त्यांच्या हक्कांसाठी “बिराड मोर्चा” काढला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शांततापूर्ण आंदोलनाचा उद्देश झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाच्या मागण्या मांडणे आणि सरकार व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा होता. मोर्चामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, तसेच लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. […]