ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmer Protest : शंभू बॉर्डरवर मोठा राडा, शेतकऱ्यांविरोधात पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर

नवी दिल्ली पंजाबमधील शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी अंबालाच्या शंभू सीमेवर पोहोचले आहेत. येथे आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनचा वापर करून आकाशातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंभू सीमेवर सध्या परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलीस शेतकऱ्यांना रोखण्याचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अखेर अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, वाजतगाजत भाजपमध्ये प्रवेश

मुंबई माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आणि म्हणूनच घरात वारसा असल्याने बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशादरम्यान फडणवीसांचे जुने व्हिडीओ ट्रेंडमध्ये! विरोधकांनी घेरलं!

मुंबई अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याने आता देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. विरोधकांकडून फडणवीसांचे जुने व्हिडीओ समोर आणले जात आहेत. यात एकेकाळी देवेंद्र फडणवीसांनी आदर्श घोटाळ्यावरुन अशोक चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं होतं. आज त्यांचाच भाजप प्रवेश होत असल्याने भाजपवर बोट ठेवलं जात आहे. आदर्श घोटाळा आणि सिंचन घोटाळा कसा झाला यावर बोलतानाचा देवेंद्र फडणवीसांचा एक […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सोनिया गांधी उद्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार, प्रियांका गांधींनी मात्र नाकारली ‘ती’ ऑफर

नवी दिल्ली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी बुधवारी (१३ फेब्रुवारी) राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यापूर्वी ही ऑफर प्रियांका गांधी यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस सरचिटणीस […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmers Protest : 18,000 सुरक्षा दल, ड्रोनवरुन पाळत, शेतकऱ्यांना दिल्लीकडे रोखण्यासाठी सरकारची सुरक्षा योजना

नवी दिल्ली पंजाबच्या फतेहगड साहिबवरुन ट्रक आणि ट्र्रॅक्टरवरुन शेतकरी आज नवी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सोमवारी १२ फेब्रुवारीच्या रात्री चंदीगडमध्ये साडेपाच तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात किमान आधारभूत किंमत हमी कायदा आणि कर्जमाफीवर एकमत होऊ शकले नाही. यानंतर किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी दिल्ली मोर्चाची घोषणा केली. शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार, उद्या राज्यसभेचा अर्जही भरणार!

मुंबई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तासात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून आज दुपारी १२.३० वाजता पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारी शिबिरात पैसे घेऊन शस्त्रक्रिया; ग्राम विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात काय सुरु आहे?

जळगाव एका ग्रामीण रुग्णालयात झालेल्या सरकारी शिबीरात रुग्णांकडून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मतदारसंघात घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी पाच सदस्यांच्या समितीचं गठण केलं आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आता अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का?’

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांची मूट बांधण्याचं काम सुरू असताना पक्षांमधील Out Going थांबवणं अशक्य होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. यावर आता संजय राऊतांनी भीती वाढवणारी शक्यता व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांप्रमाणे आता अशोक चव्हाणदेखील काँग्रेसवर दावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्वजीत कदमदेखील काँग्रेस सोडणार? Video मधून दिली महत्त्वाची माहिती

सांगली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसमधून राजीनामा दिला. या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं नेमकं कारण अद्याप जाहीर केलंलं नाही. दरम्यान त्यांच्यासोबत ११ आमदार पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पंतगराव कदम यांचे सुपूत्र विश्वजीत कदम यांचंही नाव […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भाजप ही भयग्रस्त झाली आहे, म्हणून…’; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर घणाघात

पुणे ‘काल ११ फेब्रुवारीला देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील आम्ही चारशेहून अधिक जागा जिंकणार, तर ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत आहेत’ […]