ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही…’, काँग्रेसच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी इतक्या वर्षांच्या कामानंतर काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. निवडणुका तोंडावर असताना चव्हाणांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजीनाम्यानंतर पहिल्यांदा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मला पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही आणि कोणाची उणीदुणी काढायची नाही. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आगे आगे देखीये होता है क्या’; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

मुंबई लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेसला मोठं खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. असं असताना चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले. काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आज उपोषणाचा तिसरा दिवस

जालना मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. कालपासून पाटलांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारपासून जरांगे स्टेजवर झोपून आहेत. तपासणी डॉक्टर आले असता पाटलांनी तपासणी करून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Rajya Sabha : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, महाराष्ट्र मात्र प्रतीक्षेतच!

नवी दिल्ली भाजपने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. १५ राज्यांतील ५६ राज्यसभा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. दरम्यान भाजपकडून बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल राज्यातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘दाढी रावणाला होती, रामाला नाही’; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची खरमरीत टीका

मुंबई ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं वक्तव्य काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘लंका त्यांचीच आहे, आम्ही हनुमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. यासाठी एकनाथ शिंदेंना रामायण, महाभारत वाचावं लागेल’ अशा शब्दात संजय राऊतांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मेरे साथ अन्याय हुआ, मुझे फसाया गया’, मॉरिसचा अंगरक्षक ओरडत कोर्टाबाहेर पडला; 13 फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

मुंबईमिलिंद माने शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमरेंद्र मिश्रा नामक मॉरिसच्या बॉडीगार्डला न्यायालयाने 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मुंबईतील न्यायालयामध्ये आज झालेल्या सुनावणीनंतर मिश्राने आपल्याला अभिषेक घोसाळकर प्रकरणात नाहक अडकवण्यात आल्याचा आरोप केला. न्यायालयामधून बाहेर पडताना अक्षरशः अमरेंद्र मिश्रा ओरडतच बाहेर पडला. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कापसाला भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यानं थेट कापसाची गाडीच पेटवली, सरकार काय करतंय? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मांडली व्यथा

नागपूर राज्यातील शेतकऱ्यांसमोर यावर्षी कमी पाऊस आणि अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलेलं आहे, त्यातच सुल्तानी संकटांचा सामनाही त्यांना सहन करावा लागतोय. कांद्याची निर्यातबंदी, कापसाला, सोयाबीनला योग्य भाव न मिळण्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राजकीय नेते मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात आणि लोकसभा निवडणुकांच्या तयारीत गुंतल्याचं दिसतंय. अशात विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांनी विदर्भारतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा एक्स […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मी बाबर किंवा जिन्नांचा प्रवक्ता नाही, रामाचा आदर मात्र…’ , राम मंदिर वादादरम्यान असदुद्दीन ओवैसी लोकसभेत काय म्हणाले?

नवी दिल्ली मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील अखेरचं अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशनच्या अखेरच्या टप्प्यात राम मंदिराच्या अभिनंदनाचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्यात आला. राम मंदिर निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतंय. कुणी दिल्या लोकसभेत बाबरी जिंदाबादच्या घोषणाएमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी या चर्चेवेळी बोलताना लोकसभेत मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. मोदी सरकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

घोसाळकरांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती का? उद्धव ठाकरेंच्या संकेताने खळबळ

मुंबई अभिषेक घोसाळकर यांच्या निघृण हत्येनंतर उद्धव ठाकरे माध्यमांसमोर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. ‘मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलेला आहे. ते निर्ढावलेले आहेत, सर्वांच्या जीवाची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही स्वत: दिल्लीत जाऊन दिल्लीश्वरांसमोर शेपटी हलवता’, अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येविषयी बोलताना उद्धव ठाकरेंनी मोठा संशय व्यक्त केला. दहिसरमध्ये […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात CAA लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा

नवी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात CAA लागू करण्यात येईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. अमित शाह म्हणाले की, CAA मुळे कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. […]