ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आगे आगे देखीये होता है क्या’; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर फडणवीसांचं सूचक वक्तव्य

मुंबई

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेसला मोठं खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. असं असताना चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले. काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं फडणवीसांनी दिले. काँग्रेसमध्ये नेत्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे ‘आगे आगे देखीये होता है क्या’ अशा शब्दात फडणवीसांनी संकेत दिले.

काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात