राज्यसभा उमेदवारीची भाजपची त्रिसूत्री, जात, महिला आणि निष्ठावंत, एकाच दगडात किती पक्षी?
मुंबई राज्यातील सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, भाजपच्या पुण्यातील नेत्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेश आहे. यावेळी भाजपकडून राज्यसभेसाठी ओबीसी-मराठा-ब्राम्हण (महिला) अशी त्रिसूत्री राबवत समतोल साधल्याचं दिसून येत आहे. भाजपकडून राज्यसभेत लिंगायत समाजाचे डॉ. अजित गोपछडे […]








