ताज्या बातम्या महाराष्ट्र

वरुड-मोर्शीचा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उत्पादकांसाठी ठरेल गेम चेंजर; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास

मुंबई संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी वरुड-मोर्शी येथील अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन वरुड-मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसच्या बैठकीतून 7 आमदार गायब, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…

मुंबई काँग्रेसकडून आज विधिमंडळात आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे ३६ आमदार उपस्थित होते. बैठक संपली तरी ७ आमदार आलेच नाहीत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणकोणते आमदार त्यांच्यासोबत जाणार याबाबत चर्चा सुरू असताना आता विधिमंडळाच्या बैठकीत ७ आमदारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे योजनेवर बंदी, आदित्य ठाकरेंकडून निकालाचं स्वागत

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना बेकायदेशीर घोषित केली असून त्यावर बंदी घातली आहे. निवडणूक रोखे हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. एक “घटनाबाह्य” योजना माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. आता महाराष्ट्राला आशा आहे की, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकीकडे आमदार अपात्रतेची टांगती तलवार, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार बारामतीत

बारामती आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहेत. आजचा दिवस राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा असणार आहे. दुसरीकडे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आजपासून शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. १५, १६ आणि १७ फेब्रुवारीपर्यंत शरद पवार बारामती मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यानंतर १८ तारखेला शरद पवार पुरंदर दौऱ्यावर आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, स्वतःच्या शरीराचा त्याग करण्यात काहीही अर्थ नाही’; प्रकाश आंबेडकरांचा पाटलांना सल्ला

मुंबई आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे, असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असे वंचित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का, बबनराव घोलपांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, शिंदे गटाची वाट धरणार?

नाशिक आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बबनराव घोलप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मी मेलो तर या सरकारला सोडू नका’ मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन, आज उपोषणाचा पाचवा दिवस

जालना मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी जरांगे पाटलांना जबरदस्तीने सलाईन लावून उपचार सुरू केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज निकाल

मुंबई आज राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणावर निकाल असल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष आज सायंकाळी हा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवलं नव्हतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत वेगळा निकाल लागू शकण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ना पार्थ पवार, ना बाबा सिद्दीकी, ना सुनील तटकरे; राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी अनपेक्षित नावाची घोषणा!

मुंबई आज भाजप, शिवसेना शिंदे आणि काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणाचं नाव जाहीर करणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. अखेर सस्पेंस संपला असून अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आताच राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव, आयारामांना राज्यसभेची उमेदवारी; निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच’, नाना पटोलेंची टीका

मुंबई महायुतीकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातून चौघांची नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांची नावं जाहीर करण्यात आली. चार पैकी दोन नावं काँग्रेसमधून आताच भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची आहे. यावरुन काँग्रेसकडून महायुतीवर टीका करण्यात आली आहे. ‘राज्यसभेच्या […]